Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची आता ठाकरे सरकारला साथ?; ‘या’ मंत्र्याने केलं सूचक वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठा समाज आणि मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर तीन दिवस आमरण उपोषण केलं होतं. अखेर तीन दिवसांनंतर संभाजी राजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. मात्र अशातच संभाजीराजे महाविकास आघाडी सरकारसोबत (Government) काम करण्याबाबत मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केलं आहे.

 

मराठा समाजाच्या (Maratha Society) मागण्यांसाठी संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह आम्ही सर्वांनी महाराजांसोबत चर्चा केली आणि त्यांच्या मागण्या पुर्ण केल्या त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. संभाजी महाराजांनी महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) कामाबद्दल विश्वास (Trust) व्यक्त केला. त्यासोबतच त्यांनी पुढे एकत्र कम करण्याची ग्वाही दिल्याचं अमित देशमुख म्हणाले.

 

यावरून पत्रकारांनी देशमुखांना प्रश्न विचारला तेव्हा, संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या. मात्र काही चर्चेतील मागण्या होत्या त्याला अंतिम स्वरूप येईपर्यंत एकत्र काम करण्याची ग्वाही दिल्याचं अमित देशमुखांनी सांगितलं.

 

दरम्यान, तीन दिवस चाललेलं उपोषण हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil),
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी
संभाजीराजेंची आझाद मैदानात भेट घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी हमीपत्र दिलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतलं.

 

Web Title :- Sambharaje Chhatrapati | Thackeray government minister amit deshmukh big statement on yuvraj chhatrapati sambhajiraje

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा