पुरंदर किल्ल्यावर शंभुगौरव पुरस्कार व संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर किल्ला (ता. पुरंदर ) येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 340 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट पुणे यांचे वतीने
विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते शंभुगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

यावेळी विजयसिंह डुबल (उद्योजक), उमेश पोवार (सामाजिक), ओंकार जाधव (क्रीडा) क्षेत्रातील शंभुगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कराटेरत्न सतिश पाटील व बाल गिर्यारोहक साई कवडे यांचा सन्मान करण्यात आला.

वैशाली येडे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास सप्तनद्यांचे जल व दहीदुधाने अभिषेक घालण्यात आला. तत्पूर्वी गडावर शंभूराजांच्या पालखीची ढोल ताशाच्या गजरात आणि मर्दानी खेळांच्या प्रत्यक्षिकांसह मिरवणूक काढण्यात आली. रोहित पाटील व राहुल पोकळे यांनी आपले विचार व्यक्त केले.

श्रीशंभूराज्याभिषेक विशेषांक तसेच नाणी संग्रह व संग्राहक या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील, आमदार संजय शिंदे, संभाजी ब्रिगेडचे अमोल काटे, अजयसिंह सावंत, राहुल पोकळे, संदीप जगताप, सागर जगताप, संतोष हगवणे, भगिरथ घुले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप कणसे यांनी केले. उपस्थितांचे आभार अमोल काटे व प्रदीप बेलदरे पाटील यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/