‘राहुल गांधी नेमकं कोणत्या देशाचं राष्ट्रगीत गात आहेत ?’ – संबित पात्रा यांची बोचरी टीका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी नेमकं कोणत्या देशाचं राष्ट्रगीत गात आहेत असा सवाल उपस्थित करत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर  खरमरीत शब्दात टीका केली आहे. संबित पात्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे की, राहुल गांधी कोणत्या देशाचं राष्ट्रगीत गात आहेत ? या व्हिडीओ राष्ट्रगीत सुरु असताना राहुल गांधी फक्त ओठ हलवताना दिसत आहे. ते राष्ट्रगीत म्हणतच नसावे असावे असंच काहीसं दिसत आहे.

संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत सर्वजण राष्ट्रगीत म्हणत आहेत. या राहुल गांधीही दिसत आहेत. परंतु ते फक्त ओठ हलवताना दिसत आहे. जणू काही त्यांना राष्ट्रगीत येत नसावं आणि ते फक्त राष्ट्रगीत म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत असेत काहीसे दिसत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी राष्ट्रगीत म्हणताना बरेच गोंधळलेले दिसत आहेत. त्यावरून पात्रा यांनी राहुल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान संबित पात्रा यांचे हे ट्विट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रिट्विट केले आहे.

राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्या व्हिडीआेवर टेक्स्ट लिहिली आहे. तीच टेक्स्ट कॅप्शनमध्ये लिहिली आहे. राहुल गांधी कोणत्या देशाचं राष्ट्रगीत म्हणत आहेत असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आता राहुल गांधी हे संबित पात्रा यांच्या ट्विटला काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.