खुशखबर ! नोव्हेंबरपासून ‘मेट्रो’, ‘मोनो’, ‘लोकल’ आणि ‘बेस्ट’च्या प्रवासासाठी आता एकच ‘कार्ड’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईतील प्रवाशांसाठी एक खुशखबर असून लवकरच तुम्हाला रेल्वे, मेट्रो, मोनो आणि बेस्टच्या बसने प्रवास करण्यासाठी वेगवेगळे तिकीट काढण्याची गरज पडणार नाही. बेस्ट महामंडळ नोव्हेंबरमध्ये नवीन स्मार्ट कार्ड आणणार असून यामधून तुम्ही कोणत्याही वाहनाने प्रवास करू शकणार आहात. बुधवारी ७ ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या बेस्ट दिवस साजरा केला जाणार असून बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी याविषयी माहिती दिली.

सध्या, मुंबई रेलवे विकास बोर्डाने या तिकीट प्रणालीसाठी रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवले असून त्यांच्या मंजुरीची वाट पाहत आहे. रेल्वे बोर्ड देखील याला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचबरोबर बेस्ट देखील या प्रणालीसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांसाठी हि सुविधा ट्रायल बेसवर सुरु करण्यात येणार असून यामध्ये फक्त काही बसचाच समावेश असणार आहे.

दरम्यान, रेल्वे आणि मेट्रो-मोनो देखील आपल्या यंत्रणांमध्ये सुधारणा करणार असेल तर हे स्मार्ट कार्ड त्याठिकाणी देखील चालणार आहे. या कार्डद्वारे प्रवाशांना तिकीट विकत घेता येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –