मारेकऱ्यांनी डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश यांच्यावर एकाच पिस्तूलातून गाेळ्या झाडल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया घालणार्‍या सचिन अंदुरेचा मेव्हणा शुभम सराळेकडून हस्तगत केलेल्या पिस्तुलामधूनच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी न्यायालयात केला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अंदुरेला सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली असून सध्या तो कोठडीत आहे. रविवारी त्याच्या कोठडीची मुदत संपत असल्याने सीबीआयने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या कोठडीची मुदत दि. 30 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b3bea4e-a91f-11e8-815e-39bcff5a002e’]

तपास यंत्रणांनी शुभम सरोळेकडून काळया रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्‍त केले आहे. गौरी लंकेश यांची हत्या त्याच पिस्तुलातून करण्यात आली असून त्याप्रकरणी सखोल तपास करावयाचे असल्याचे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. गौरी लंकेश यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी ते पिस्तुल आणि 3 काडतुसे अंदुरेकडे दिली होती. अंदुरेने ते पिस्तुल सरोळेकडे दिले. सरोळेने ते पिस्तुल रोहित रेगेकडे दिले आणि सीबीआयच्या पथकाने ते पिस्तुल रेगेकडून जप्‍त केले. शरद कळसकर आणि अंदुरेकडे एकत्रित तपास करावयाचा असल्याने अंदुरेच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली. त्याला विरोध करीत आरोपीच्या वकिलांनी दाभोळकर हत्येप्रकरणी काहीच तपास झाला नाही. तपास झाला असल्यास त्याचा प्रगती अहवाल सीबीआयने सादर करावा असे सांगत आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.

दरम्यान, शरद कळसकर हा राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत आहे. त्याच्या कोठडीची मुदत दि. 28 ऑगस्टला संपते. त्यानंतर सीबीआय त्याला अटक करणार आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे आणि राजेश बंगेरे यांचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध आहे. त्यांनी पुण्यात रेकी केली होती. त्यामुळे सीबीआय त्या दोघांचा ताबा कर्नाटकच्या एटीएसकडून घेणार असून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली जाणार आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93074ef7-a91f-11e8-8e3e-0f46f004be6e’]

अमोल काळे हा मुळचा पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी आहे. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकणाशी त्याचा संबंध उघड झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडसह पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. सीबीआयने सर्व आरोपींकडे एकत्रितरित्या तपास केल्यास अनेक धक्‍कादायक बाबी समोर येण्याची दाट शक्यता आहे.

इतर बातम्या

नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा जप्त 

नालासोपारा स्फोटकप्रकरणात घाटकोपरमधून आणखी एक अटकेत

दाभोलकर हत्येप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरच्या चाैकशीची शक्यता ?