सेम टू सेम ! करिष्मा कपूरची Duplicate पाहून तुम्हाला बसेल ‘धक्का’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या क्लिप मधली तरुणी ही हुबेहुब बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसारखी दिसत असल्यामुळे या व्हिडिओची जास्त चर्चा होत आहे. पण करिश्मा सारखी दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.

करिश्मा कपूर सारखी दिसणाऱ्या या मुलीचे नाव हिना खान आहे. ती एक टिकटॉक स्टार असून पाकिस्तानमध्ये राहते. ती सतत करिश्मा कपूरच्या गाण्यांवर व्हिडीओ तयार करुन शेअर करत असते. तिच्या या व्हिडिओस वर अनेक चाहते प्रेमाचा वर्षाव करतात तर एका चाहत्याने तर ‘कुद्रत का करिश्मा’ असे म्हटले आहे.