Sameer Chaugule | ‘त्या’ नृत्यामुळे हास्यजत्रा फेम समीर चौघुलेंना मागावी लागली जाहीर माफी

पोलीसनामा ऑनलाइन – Sameer Chaugule | महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारा सोनी मराठीवरील (Sony Marathi) महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम चांगला गाजला आहे. संपूर्ण राज्यभरातून या कार्यक्रमाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत. कार्यक्रमातील अभिनेते समीर चौगुले (Sameer Chaugule) यांचा अभिनय व विनोदाचा परफेक्ट टाइमिंग यामुळे समीर यांचे लाखो चाहते निर्माण झाले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शोमध्ये समीर चौगुले हे अभिनेता आणि लेखक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतात.

हास्यजत्रा कार्यक्रमात चौगुलेंनी साकारलेले लोचण मजनू, शिवालीचा बाबा, दाराचा आवाज या भूमिका खूप गाजल्या आहेत. आपल्या विनोदी अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या समीर चौगुलांनी विनोदामध्ये आदिवासी (Adivasi) समाजाचा अपमान केल्याबद्दल त्यांना जाहीर माफी मागावी लागली आहे. त्यांच्या एका नृत्यामुळे त्यांना ही माफी मागावी लागली आहे.

Advt.

आदिवासी समाजातील प्रसिद्ध लोकनृत्य असलेले ‘तारपा नृत्य’ (Tarpa Dance) हे तेथील संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र हास्यजत्रेत सातत्याने विनोदासाठी समीर चौगुले हे विचित्र पद्धतीने ‘तारपा’ करून विनोद निर्मिती करत होते. यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या केल्या असून त्यांनी हे नृत्य कार्यक्रमात बंद करण्याचे आवाहन केले होते. समीर चुकीच्या पद्धतीने नाचून, त्या लोकनृत्य प्रकाराची अवहेलना करत असल्याचा या समाजाकडून करण्यात आला. याबाबत त्यांनी समीर चौगुलेची भेट घेऊन यावर आक्षेप नोंदवला.

अभिनेता समीर चौगुले यांनी ही झालेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारत जाहीर माफी देखील मागितली आहे.
त्याच्या माफीचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये ते दिलगिरी व्यक्त करत आहे.
समीर म्हणाले आहेत की, “मी तारपा नृत्य सादर केलं होतं पण यामुळे माझ्या आदिवासी बंधु भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या झालेल्या प्रकाराबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. अनावधानाने माझ्याकडून हा प्रकार झाला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू कधीच नसतो. या पुढे भविष्यात कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ, याची मी तुम्हाला ग्वाही देतो”.

ज्याप्रमाणे साहित्यिक पु. ल. देशपांडे (P. L. Deshpande) म्हणतात की, ‘जो विनोद दुखावतो तो कुरुप असतो
व कलेला कुरुपतेचं कौतुक असू नये’. त्याप्रमाणे समीर चौगुलेंकडून (Sameer Chaugule) झालेली चूक त्यांनी मान्य
केली असून मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे.

Web Title : Sameer Chaugule | maharashtrachi hasyajatra fame samir choughule apologized for making fun of adivasi tribal community tarpa dance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खून व मोक्का गुन्ह्यातील महिला आरोपीला जामीन मंजूर

Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला चिपळून येथून अटक

PMFBY-Crop Insurance | पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन