Advt.

Sameer Khan Case | नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या अडचणी वाढणार? एनसीबीचा NDPS न्यायालयात अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sameer Khan Case | राज्यात गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर अनेक खुलासे आणि घडामोडी घडताना दिसत आहेत. या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. तर अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (NCB) आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (Aryan Khan Drugs Case), समीर खान प्रकरण (Sameer Khan Case) व अन्य 4 प्रकरणांचा नव्याने तपास सुरू असून NCB ने आज एनडीपीएस न्यायालयात (NDPS Court) समीर खान प्रकरणाच्या अनुषंगाने एक अर्ज केला आहे. या अर्जावरून मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

या प्रकरणामध्ये आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) व येथील अन्य अधिकाऱ्यांऐवजी दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी (SIT) तपास करीत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची नव्याने पडताळणी सुरू झालीय. त्याचबरोबर समीर खान आणि इतर 2 जणांच्या आवाजाचे नमुने एसआयटीला घ्यायचे आहेत. त्यासाठी एनसीबीकडून (NCB) आज विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. ही परवानगी मिळाल्यास तिघांचेही आवाजाचे नमुने घेऊन आगामी तपास सुरू करण्यात येणार आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

ड्रग्ज प्रकरणात समीर खान आणि ब्रिटिश नागरिक करन सजनानी या दोघांना यंदा जानेवारी महिन्यात अटक केली होती.
दोघांकडे मोठ्या प्रमाणात सीबीडी आणि गांजा सापडल्याचा एनसीबीचा (NCB) दावा होता.
त्यातील एकूण 18 सँपल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
त्यापैकी 11 सँपलचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. एनसीबीच्या तपासात समीर खान (Sameer Khan Case)
आणि करन सजनानी यांच्यातील व्हॉइस चॅटची तपासणी करण्यात आली होती.
काही आवाजाचे नमुने गोळा करून त्यांचीही पडताळणी करण्यात आली होती.
आता पुढील तपासासाठी आवाजाचे नमुने नव्याने तपासावे लागणार असून त्यासाठीच एनसीबीने कोर्टात अर्ज केला आहे.

 

Web Title :- Sameer Khan Case | ncb moves court to seek voice samples of nawab maliks son in law sameer khan in drug case mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा