Sameer Wankhede | वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sameer Wankhede | गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत. आरोपांमुळे अनेक नवेच खुलासे समोर येत आहेत. काल मलिकांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. या सवालानंतर वानखेडे कुटुंबीयांनी हिंदू पद्धतीने केलेल्या विवाहाचे फोटो (Wedding photos) शेअर करत नवा मलिकांच्या ट्विटवर पलटवार केला आहे.
कबूल है, कबूल है, कबूल है…
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021
नवाब मलिकांनी (Nawab Malik) मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने राज्यात खळबळ उडाली. मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. समीर वानखेडे यांच्या लग्नाच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसून येते. परंतु, त्याबाबत मलिक यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, फोटोवरूनच मलिकांनी सवाल उपस्थित केला आहे की, ‘कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’
–
दरम्यान, मलिक यांनी फोटो शेअर करत आरोप केल्यानंतर वानखेडे कुटुंबातील एका सदस्याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar-Wankhede) यांच्याही विवाहाचे फोटो (Wedding photos) शेअर केले.
तसेच, आई मुस्लीम असल्याने तिच्या म्हणण्यानुसार मुस्लीम पद्धतीने विवाह केला होता.
कारण, आम्ही भारतीय राज्यघटनेतील खऱ्या भारतीय आचार आणि धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो,
असे वानखेडे कुटुंबीयांनी म्हटलंय. तसेच, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर वानखेडे यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत,
हा लग्नसोहळा हिंदू पद्धतीने केल्याचं देखील त्यांनी फोटोसह सांगितलं आहे.
Web Title :- Sameer Wankhede | aryan khan drug case mother marry muslim manner we adhere secular sentiment sameer wankhede family to nawab malik marathi news policenama
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Farm Laws | ‘या’ कारणामुळे PM मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले, नेमकं अन् खरं नेमके कारण आलं समोर
Foreign Liquor Prices | इतर राज्यांतून मद्य आणल्यास कारवाई; परवानगीनंतरच विदेशी मद्याचे दर कमी होणार