मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला कथित ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) ताब्यात घेतले होते. यानंतर तत्कालीन एनसीबी अधिकारी (NCB Officer) समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि इतर तिघांनी 25 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी सीबीआयने (CBI) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने आता एफआयआरमध्ये मोठा खुलासा केला आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के.पी. गोसावी (K.P.Gosavi) याने आर्यन खानच्या कथित ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी उकळण्याची योजना आखली होती, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये केला आहे.
In an FIR against former NCB head Sameer Wankhede and others in cruise case, CBI reveals that ‘independent witness’ KP Gosavi planned to extort Rs 25 crores from Aryan Khan's family in the alleged Aryan Khan drugs case.
— ANI (@ANI) May 15, 2023
आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी सीबीआयकडून कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून
समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांजी, कानपूरसह 29 ठिकाणांवरील मालमत्तांवर
धाडी टाकण्यात आल्या होत्या.
काय आहे प्रकरण?
2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्ज प्रकरणात केलेल्या या कारवाईत
आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते.
एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं.
पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती.
Web Title :- Sameer Wankhede | cbi reveals that independent witness kp gosavi planned to extort rs 25 crores from aryan khans family in the alleged aryan khan drugs case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update