Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव; पोलीस ठाण्यातही दाखल केली तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येथील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Drugs Case) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) आरोप केले होते. त्यामुळे दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. अजूनही हे शाब्दिक युद्ध काही थांबले नाही. दरम्यान, वानखेडेंवर सातत्याने आरोप होत असल्याने छापेमारीचा संशय व्यक्त होत आहे.

 

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे हे सांगण्यापासून ते वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी लाटल्याचा आरोप केला आहे. इतकच नाही तर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो, निकाहनामावरून वानखेडे कुटुंबियांवर निशाणा साधला. त्याचबरोबर मलिक यांनी समीरचं बर्थ सर्टिफिकेटसुद्धा जारी केले. त्यातच ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांकडून अनेक धक्कादायक खुलासे होत असतानाच मलिक यांनी समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे (Yashmin Wankhede) यांच्यावरही वसुलीचा आरोप केला आहे. यामुळे राज्यात वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरण चांगलेच गाजत आहे.

 

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी मलिकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तसेच राष्ट्रीय महिला योगाकडेही त्यांनी धाव घेतली आहे.
यास्मिन यांनी आयोगाला दिलेल्या पत्रात एका महिलेच्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एक नोकरदार माणसाच्या जन्म प्रमाणपत्राबाबत शोध घेणारे नवाब मलिक कोण आहेत?
त्यांची रिसर्च टीम दुबईपासून मुंबईपर्यंत (dubai to mumbai) आमचे फोटो पोस्ट करत आहेत.
आम्हाला जीवे मारण्याची धमकी येत आहे असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

नवाब मलिकांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात (oshiwara police station) यास्मिन यांनी तक्रार दिली आहे.
खोटे आरोप करून मलिक आमची बदनामी करत असल्याचे या तक्रारीत म्हंटले आहे.
मालिकांकडे कागदपत्रे असतील तर त्यांनी मीडियासमोर वेळ वाया न घालवता न्यायालयात जावं.
न्यायालयातच आम्ही मलिकांच्या आरोपाला उत्तर देऊ असे यास्मिन यांनी म्हंटल आहे.

 

समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र वापरत दलितांचा हक्क हिसकावल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
हे जर खोटे असेल, मी दिलेले पुरावे चुकीचे असतील तर मी राजीनामा देण्यास तयार आहे असं चॅलेंजही मलिकांनी दिल आहे.
तसेच वानखेडे कुटुंबीय मलिकांविरोधात कायदेशीर लढाई लढण्यास तयार झालं आहे.
त्यामुळे वानखेडेविरुद्ध मलिक यांच्यातील वाद आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Sameer Wankhede | complaint lodged against ncp minister nawab malik in oshiwara police station national womens commission yashmin wankhede ncb officer sameer wankhede

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील ‘ससून’च्या तोतया डॉक्टरकडून 29 वर्षीय तरूणीवर बलात्कार; अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द उद्योगपतीकडे 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला अटक

Bank Holidays | पुढील आठवड्यात 5 दिवस बंद राहतील बँका, कामासाठी जाण्यापूर्वी पाहून घ्या सुट्ट्यांची पूर्ण यादी