Sameer Wankhede | समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी, गोरेगाव पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणामुळे (Cordelia Cruz case) प्रकाशझोतात आलेले अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (Narcotics Control Cell) माजी विभागीय संचालक (Former Divisional Director) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) आल्याची माहिती समोर आली आहे. ‘जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील’ असा संदेश त्यांना पाठवण्यात आला आहे. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी पोलिसांना सविस्तर माहिती दिली. अमन नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन त्यांना धमकी मिळाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस याचा तपास करत आहेत. वानखेडे यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यापासून धमक्या येत आहेत.

 

याप्रकरणी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) तक्रार दिली आहे. या धमकीच्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे. वानखेडे यांना आरोपीने टॅग करुन हा मेसेज केला होता. यावर वानखेडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते ट्वीट डिलिट केले. तपासात हे अकाउंट त्याच दिवशी सुरु करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते (NCP) नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना बनावट जात प्रमाणपत्राद्वारे (Fake Caste Certificate) सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता.
या आरोपांमुळे समीर वानखेडे प्रचंड अडचणीत आले होते.
मात्र अलीकडेच समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून (Caste Certificate Verification Committee) क्लिनचिट देण्यात आली होती.
समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही.
त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला होता.

 

Web Title : – Sameer Wankhede | former ncb officer sameer wankhede got threat on twitter account

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा