Sameer Wankhede | समीर वानखेडेंचा राजेशाही थाट समोर; कोट्यावधी रुपयांची उलाढाल उघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sameer Wankhede | सुप्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यावर अंमली पदार्थांमुळे केलेल्या कारवाईमुळे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede Case) हे वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहेत. समीर वानखेडे यांची क्रुझ ड्रग्ज प्रकरणामुळे (Aryan Khan Drug Case) चौकशी चालू आहे. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष चौकशी समितीने ऑक्टोबर २०२१ मध्ये समीर वानखेडे यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अहवालात ज्ञानेश्वर सिंह (Dnyaneshwar Singh) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत. या अहवालाच्या आधारे एनसीबीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात (Affidavit) समीर वानखेडे यांच्या संपत्तीचा डोळे दिपवणारा आकडा समोर येत आहे.

समीर वानखेडेंनी २०१७ ते २०२१ या काळात आपल्या कुटुंबीयांसोबत सहावेळा परदेशवारी केली आहे. त्यामध्ये युके (UK), आयर्लंड (Ireland), पोर्तुगाल (Portugal), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि मालदीवसारख्या (Maldives) ट्रिप्सचा समावेश आहे. या सगळ्या ट्रिप्सचा कालावधी एकत्र केला तर लक्षात येईल की समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय ५५ दिवसांपेक्षा अधिक काळ परदेशात होते. यासाठी ८.७५ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे वानखेडे यांनी सांगितले आहे. मात्र एवढ्या कमी रकमेत एवढ्या देशांमध्ये जाण्याचा विमान खर्चही निघत नाही.

(Sameer Wankhede)  समीर वानखेडे आणि त्यांचा मित्र विरल राजन (Viral Rajan) कुटुंबीयांसोबत २०२१ साली जुलै महिन्यामध्ये मालदीव ट्रिपला गेले होते. याठिकाणी वानखेडे आणि राजन यांचे कुटुंबीय आणि नोकर मालदीवच्या ताज एक्सोटिका रिसॉर्टमध्ये (Taj Exotica Resort) उतरले होते. याठिकाणी राहण्यासाठी वानखेडे कुटुंबीयांनी तब्बल ७.५ लाख रुपये भरले होते. त्यानंतर वानखेडे यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची चौकशी सुरु झाल्यानंतर विरल राजन यांच्या क्रेडिट कार्डवरून (Credit Card) रिसॉर्टचे उर्वरित बिल भरले होते.

समीर वानखेडे यांनी रोलेक्स (Rolex) कंपनीची २२ लाख रुपयांची चार घड्याळं मित्र विरल राजन याच्याकडून
१७.४ लाख रुपयांना उधारीवर विकत घेतली होती. (Rolex Watch) घड्याळ्यांच्या एका बिलावर २२.०५ लाख
आणि दुसऱ्या बिलावर २०.५३ लाख अशी किंमत आहे. तसेच समीर वानखेडे यांनी विरल राजन याला चार घड्याळं
विकली होती. यासाठी विरल राजनने ७.४ लाख रुपयांचा चेक वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर
(Kranti Redkar) यांच्या नावावर जमा केला होता. एवढ्या किंमतीची उलाढाल पाहून सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहे.
समीर वानखेडे यांना विरल राजनने इतक्या लवकर विकलेल्या घड्याळ्यांचे पैसे कसे दिले आणि वानखेडे यांना
विरल राजनने २२ लाख रुपये उधारीवर कसे दिले, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Advt.

समीर वानखेडे यांच्या मालकीचे मुंबईत (Mumbai) चार फ्लॅटस आहेत. याशिवाय, वानखेडे यांची
वाशिममध्ये (Washim) ४.२ एकर इतकी जमीन आहे. याशिवाय, गोरेगाव (Goregaon) येथे वानखेडे यांनी
अडीच कोटी रुपयांना पाचवा फ्लॅट विकत घेतला होता. या फ्लॅटसाठी वानखेडे यांनी ८२.९० लाखांचा अतिरिक्त
खर्च केल्याची माहिती एनसीबीच्या चौकशीत पुढे आली होती. आपली पत्नी क्रांती रेडकर हिने लग्नापूर्वी २०१७
साली फ्लॅटमध्ये १.२५ कोटी गुंतवले होते, असेही वानखेडे यांच्याकडून सांगण्यात आले.
समीर वानखेडे यांनी त्यांच्या संपत्तीचा दिलेला तपशील आणि मूळ कागदपत्रांच्या माहितीमध्ये जमीन
आसमानची तफावत असल्याचे समोर आले आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede Case) यांनी
विरल राजन याच्याकडून ५.६ लाखांचे कर्जही (Loan) घेतले होते. त्याबाबतही त्यांनी एनसीबीला माहिती दिली नव्हती.

Web Title : Sameer Wankhede | In front of Sameer Wankhede’s royal grandeur; Turnover of crores of rupees revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DPDC Meeting Pune | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा ! जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Maharashtra Politics News | ‘…तर बावनकुळेंनी बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचं खुलं आव्हान

Pune Crime News | सोलापूरचे तोतया पत्रकार हनमे बंधूंनी बडया बिल्डरकडे देखील मागितली होती खंडणी; 50 लाख अन् 2 फ्लॅटची होती डिमांड, जाणून घ्या प्रकरण