Sameer Wankhede | अखेर समीर वानखेडेंची बदली, ‘या’ विभागात केली नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रूझवरील कारवाईनंतर चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर (Mumbai NCB Zonal Director) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात (Central Customs and Excise Department) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पुन्हा बदली झाली आहे. मुदत संपल्यानं समीर वानखेडे यांची एनसीबी मधून बदली (Transfer) करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाळ संपल्यानंतर वानखेडे यांना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप (BJP) नेते दिल्ली लॉबिंग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) ऐकवत वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता.

 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच, एनसीबीचे झोनल डायरेक्टर आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा एनसीबी मधील कार्यकाळ 31 डिसेंबर 2021 रोजी संपला आहे. त्यानंतर त्यांना मुदत वाढ न मिळाल्याने ते आपल्या आयआरएस केडरमध्ये (IRS cadre) परत जातील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयआरएस कस्टम आणि सेंट्रल एक्साईज असं केडर असलेले वानखेडे पुन्हा आपल्या खात्याच्या सेवेत रुजु होतील.

IRS चे दोन केडर कोणते?
IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्विसचे दोन कॅडर आहेत. एक प्राप्तिकर म्हणजे Indian Revenue Service (Income Tax) हे कॅडर मिळालेल्या आयआरएस अधिकाऱ्याची नियुक्ती सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स Central Board of Direct Taxes (CBDT) या विभागात होते.

 

दुसरे कॅडर आहे इनडायरेक्ट टॅक्स किंवा कस्टम ड्युटी Indian Revenue Service (Customs & Indirect Taxes) हे केडर मिळालेल्या
आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि कस्टम्स Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) मध्ये केली जाते.
समीर वानखेडे यांचं हे कॅडर हे अप्रत्यक्षकर वसुलीचं आहे.

 

 

Web Title :- Sameer Wankhede | mumbai ncb divisional sameer wankhede transferred to central customs and excise department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Magical Eye Drop | खुशखबर ! वैज्ञानिकांनी बनवला डोळ्यांसाठी चमत्कारी ड्रॉप, दूर होईल चष्मा !

 

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांचा होईल मोठा फायदा ! नवी वेतनमानाची झाली घोषणा, सॅलरीत होईल ‘इतकी’ वाढ

 

Sameer Wankhede | NCB अधिकारी समीर वानखेडेंची आणखी एक कारवाई ! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करुन 2 महिलांना अटक