मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रूझ शिपवरील ड्रग्स पार्टीची चौकशी करत असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीकडून (NCB) वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी होणार आहे. त्यासाठी एनसीबीचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. परंतु त्यापूर्वीच समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) चौकशी (Inquiry) होण्याची शक्यता आहे. सहायक पोलीस आयुक्त(ACP) दर्जाच्या अधिकाऱ्याकडून वानखेडे यांची चौकशी होणार आहे. आर्यन खान अटक प्रकरणात (Aryan Khan arrest case) 8 कोटी रुपये मिळणार होते, असा गंभीर आरोप साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यानं केला आहे. याच आरोपांची चौकशी मुंबई पोलीस वानखेडे यांच्याकडे करणार आहे.
ACP दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती
मागील काही दिवसांपासून वानखेडे यांच्यावर सातत्यानं आरोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दररोज पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांच्या विरोधातील कागदपत्रांबाबत गंभीर आरोप करत आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व तक्रारींची चौकशी त्यांच्याकडून केली जाणार आहे. आतापर्यंत मुंबईतील चार पोलीस ठाण्यात वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
MP Udayanraje Bhosale | उदयनराजे भडकले; म्हणाले – ‘काय…येड्या सारखं बोलताय’
पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा तपास सुरु
क्रूझवरील कारवाईदरम्यान (Cruise Ship Drugs Party Case) उपस्थित असलेले पंच प्रभाकर साई यांनी समीर वानखेडे यांच्यासह इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचा प्राथमिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे. मंगळवारी रात्री प्रभाकर साईल यांचा जबाब रेकॉर्ड कॅमेऱ्यात करण्यात आला. डीसीपी (DCP) दर्जाच्या अधिकाऱ्यानं साईल यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सध्या मुंबई पोलीस इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा तपास करत आहेत.
असा होणार तपास
साईल यांनी त्यांच्या जबाबात एका जबाबदार व्यक्तीचेन नाव आणि ठिकाणं यांचा उल्लेख केला आहे.
त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते तपासण्यात येणार आहेत.
तसेच प्रभाकर यांच्या फोनचं लोकेशन देखील तपासण्यात येणार आहे.
प्रभाकर यांनी पैशांच्या व्यवहारांचा उल्लेख केला आहे.
ज्या ठिकाणी या व्यवहाराबद्दल चर्चा झाली, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जातील.
यानंतर प्राथमिक अहवाल तयार करुन तो सादर केला जाईल.
त्यानंतर या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.