×
Homeताज्या बातम्याSameer Wankhede | 'लेडी डॉन'वरून नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर 'हल्लाबोल'

Sameer Wankhede | ‘लेडी डॉन’वरून नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या भगिनी यास्मिन यांचा फ्लेचर पटेल यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला असून त्या खाली त्यांना ‘माय सिस्टर, लेडी डॉन’, असे संबोधण्यात आले आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (NCP Minister Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंवर टीका केली आहे. फ्लेचर पटेल (fletcher patel) यांच्या फोटोत असणारी लेडी डॉन कोण आहे? तिचा तुमच्याशी काय संबंध? तिचे बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे, असे प्रश्न सवाल मलिक यांनी वानखेडे (Sameer Wankhede) यांना केले आहेत.

नवाब मलिक म्हणाले, वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर फोटो टाकत आहेत. ‘माय सिस्टर लेडी डॉन’ अशा उल्लेखासह टॅग करीत आहेत. त्यामुळे फ्लेचर पटेलशी वानखेडेंचा (Sameer Wankhede) संबंध काय आहे? एनसीबीच्या तीन केसेसमध्ये पटेलच पंच कसे झाले? हे त्यांनी सांगावे. तसेच बॉलिवूडमध्ये ही लेडी डॉन दहशत निर्माण करीत आहे का? याचाही खुलासा करावा असे आवाहनही मलिक यांनी केले आहे.

मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू

मलिक यांच्या प्रश्नाना यास्मिन यांनी उत्तर दिले असून त्या म्हणाल्या, माझा भाऊ चांगले काम करत आहे. मी मनसे चित्रपट सेनेची उपाध्यक्षा आहे. वकिली करते. मलिक यांनी निराधार आरोप करू नये पुरावे द्यावे. असे आव्हान मलिक यांना दिले. एवढेच नाही तर भविष्यात असे चुकीचे आरोप केले तर त्यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू असे सांगतानाच मलिक यांना कायदेशीर नोटीस तर पाठविणार असल्याचेही यास्मिन यांनी सांगितले.

तरुणांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी मदत

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर फ्लेचर पटेल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मी एक माजी सैनिक असून सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून एनसीबीला मदत करीत असतो. एनसीबी आणि समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. देशातील तरुणांना व्यसनाधीन केले जात आहे. ते रोखण्याचे काम एनसीबी करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

वानखेडे म्हणतात ‘माझ्या शुभेच्छा, सत्यमेव जयते’

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांनी मौन बाळगणे पसंत केले आहे. आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांना ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ इतक्या मोजक्याच शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे. या आरोपांबाबत अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले आहे.

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

Mohan Bhagwat | ‘370 कलम रद्द केल्यानंतरही जम्मू काश्मीरमधील समस्येचं पूर्णपणे निराकरण नाही’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Sameer Wankhede | Nawab Malik’s Hallabol on Sameer Wankhede from Lady Dawn

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News