Sameer Wankhede | नवाब मलिकांनी क्रांती रेडकरच्या बहिणीबाबत केलेल्या सवालावर समीर वानखेडेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Sameer Wankhede | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले आहेत. तसेच मलिकांनी आजही एक नवा आरोप केला आहे. वानखेडे यांच्या मेहुणी हर्षदा रेडकर (Harshda Redkar) यांच्याबाबत त्यांनी सवाल उपस्थित करत समीर वानखेडेंनी उत्तर द्यावं असं म्हटलं आहे. या पार्श्वभुमीवर समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे.

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या सवालावर उत्तर देताना समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले की,
जानेवारी 2008 मध्ये जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा मी सेवेतही नव्हतो.
मी 2017 मध्ये क्रांती रेडकरशी (Kranti Redkar) लग्न केलं.
मग तरीही मी या केसशी कसा जोडला जातो?, असा सवाल समीर वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.

 

काय म्हणाले नवाब मलिक?

 

क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकरच्या (Harshda Redkar) विरोधातला 2008 मध्ये दाखल असलेला गुन्हा अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार नाही
तर बेकायदा देहविक्री केल्याप्रकरणीचा गुन्हा असल्याची ऑफ रेकॉर्ड माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी ट्विट करून समीर वानखेडे यांना सवाल केला की, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का?
तिची केस पुणे कोर्टात (Pune Court) प्रलंबित असल्यानं तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे.
हा याचा पुरावा असल्याचंही ट्विट नवाब मलिक यांनी केला आहे.

 

Web Title : Sameer Wankhede | ncb officer sameer wankhede reaction on maharashtra minister nawab malik tweet on his sister in law harshada dinanath redkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Free Ration | रेशन दुकानदार देत नसेल पूर्ण रेशन तर ‘या’ नंबरवर करा तक्रार; काही दिवसातच होईल पुर्ण ‘समाधान’

Nawab Malik | मंत्री नवाब मलिकांच्या नव्या दाव्यामुळं प्रचंड खळबळ; ​क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस?