Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची महाराष्ट्र शासन समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे (Caste Certificate Verification Committee) खोटे जात प्रमाणपत्र असल्याची तक्रार एका तक्रादाराकडून करण्यात आली आहे. याबाबत आज तक्रारदाराला समितीने कागदपत्रे घेऊन कार्यालयात बोलावले होते. त्यानुसार तक्रारदार अशोक कांबळे (Ashok Kamble) यांचे वकील हे कागदपत्र घेऊन कार्यालयात आले होते. कांबळे यांनी कागदपत्र सादर केली, त्यानुसार प्रथम दर्शनीय समितीने या तक्रारीची गंभीर दखल घेत तक्रारदार व समीर वानखेडे (Sameer Wankhede) या दोघांनाही पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.

 

तक्रारदार समाजिक कार्यकर्ता अशोक कांबळे यांनी एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा जात प्रमाणपत्र खोटे (Caste certificate false) असल्याची तक्रार केली आहे. तसेच त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आज अशोक कांबळे यांच्या वकिलांनी कागदपत्र समितीला सादर केली. तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील नितीन सातपुते (Nitin Satpute) हे जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात आज उपस्थित होते.

 

नितीन सातपुते यांनी सर्व कागदपत्रे समितीला दिल्याचे सांगितले.
तसेच, प्रथम दर्शनी समितीने कागदपत्रे पाहून चौकशी करण्याचे मान्य केले आहे.
त्यानुसार 14 डिसेंबर रोजी समीर वानखेडे यांना कार्यालयात बोलावून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देऊ,
असे समितीने सांगितल्याचे वकील सातपुते यांनी सांगितले.

 

Web Title :- Sameer Wankhede | NCB Officer sameer wankhedes caste verification committee will investigate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Punit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला झोपेतून उठवलं अन् झाला रोमँटीक, बेडरुम व्हिडीओ झाला व्हायरल