Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातच आता या वादात मलिक यांची मुलगी निलोफर मलिक (nilofer malik khan) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका शेअर (wankhedes marriage invitation card) करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे (Dawood Wankhede) असे लिहिलेले आहे.

अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स (lokhandwala complex) येथे ७ डिसेंबर २००६ मध्ये समीर वानखेडे यांचा शबाना कुरेशी (shabana qureshi) यांच्याशी निकाह झाला आहे. या निकाहनाम्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये (marriage invitation card) समीर हे दाऊद आणि जहिदा वानखेडे (Zahida Wankhede) यांचे सुपुत्र असल्याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर मलिक यांची दुसरी मुलगी सना मलिक शेख (sana malik shaikh) यांनीही विवाह दाखला शेअर केला असून ज्यामध्ये यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षीदार असल्याचे दिसत आहे.

पत्रिकेबाबत माहिती नाही – समीर वानखेडे

पत्रिकेसंदर्भात समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी संपर्क साधला असता ती (wankhedes marriage invitation card) जी निमंत्रण पत्रिका शेअर करण्यात आली आहे ती आपली नसून पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांची आहे. त्यामुळे त्यांनी काय छापले, काय नाही हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

Web Title :- Sameer Wankhede | ncb officer sameer wankhedes marriage invitation card fathers name dawood nilofer malik khan nawab malik marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

KCR Government | ‘या’ राज्याकडून मोदी सरकारच्या विरुद्ध कृषी कायद्यांबद्दल लढताना प्राण गमावलेल्या 750 शेतकऱ्यांना 3 लाखांची मदत; ‘केसीआर’ यांनी बळीराजाचं ‘मन’ जिंकलं

Pune Crime | अत्यंत दुर्दैवी ! बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून करणाऱ्या भावाचाही मृत्य; पुणे जिल्ह्यातील घटना

Preity Zinta | आई बनल्यानंतर अभिनेत्री प्रिती झिंटा करणार बाॅलिवूडमध्ये ‘कमबॅक’; या रोलमध्ये दिसणार

Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळुन पतीची आत्महत्या; 5 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज,
गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी