Sameer Wankhede | ‘NCB ने माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं’, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांचा (ACP) आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drugs Case)  समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) वानखेडे यांच्यावर दररोज नवनवीन आरोप करत आहेत. त्यातच न्यायालयाने देखील एनसीबीच्या (NCB) तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता मुंबईतील निवृत सहायक पोलीस आयुक्त (Retired ACP) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि एनसीबीवर आरोप केले आहेत. माझ्या मुलाला खोट्या ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) अटक केल्याचे त्यांनी म्हटले. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात (Court) धाव घेतली आहे.

 

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अनंत केंजळे (Retired ACP Anant kenjale) यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांचा मुलगा श्रेयस केंजळे (Shreyas Kenjale) याला जूनमध्ये कथिक ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घटनेचा पंचनामा करताना स्वत: समीर वानखेडे (Sameer Wankhede) उपस्थित होते. परंतु पंचनाम्यामध्ये त्यांची नोंद करण्यात आली नाही. अटकेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यामध्ये समीर वानखेडे मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना दिसत आहे. रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी ते इमारतीच्या बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र, याची नोंद पंचनाम्यामध्ये घेतली जात नाही. पंचनामा आणि सीसीटीव्ही फुटेज हे संशयास्पद आहेत. त्यामुळे न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज ग्राह्य धरावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

 

 

श्रेयस केंजळेला जून महिन्यात रात्री आठ वाजता एनडीपीएस कायद्यांतर्गत (NDPS Act) अटक केली होती.
त्याच्याकडे 300 ग्रॅम गांजा सापडल्याचा आरोप एनसीबीने केला आहे.
तसेच जप्त केलेला गांजा सीलपॅक करुन नेल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.
परंतु एनसीबीची टीम श्रेयस केंजळेसह इमारतीमधून निघताना बॅगेला सील नसल्याचे दिसत असल्याचे अनंत केंजळे यांचे म्हणणे आहे.

 

केंजळे यांनी त्यांच्या निवासस्थानाचा पंचनामा अनेकवेळा एनसीबीकडे मागितला.
मात्र एनसीबीने पंचनामा दिला नाही. त्यामुळे त्यांनी मेल केला.
त्यानंतर काही वेळातच त्यांना अनोळखी क्रमांकावरुन फोन आला आणि सांगितले की, मेल पाठवायला नको होता.
आता एनसीबीचे अधिकारी त्याच्यावर मोठा खटला चालवतील, असा दावा अनंत केंजळे यांनी केला आहे.
या प्रकरणी एनसीबी या आठवड्यात उत्तर देणार आहे.

 

Web Title :- Sameer Wankhede | Retired acp anant kenjale claim that ncb sameer wankhede filed false drugs case on son shreyas kenjale Court case NDPS Act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा