Sameer Wankhede | NCB च्या वानखेडेंमागे पोलीस गुप्तहेर? पोलिस महासंचालकांकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येथील समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर (mumbai cruise drug case) छापा मारत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (aryan khan) पकडण्यात आले होते. राज्याचे मंत्री नवाब मलिक (NCP Minister Nawab Malik) यांनी आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला अटक करण्यात आली. त्यांचे लक्ष शाहरुख असल्याचा आरोप केला होता. त्यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप सुरु झाले आहेत. मात्र, आता या प्रकरणाने वळण घेतले आहे. एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी साध्या वेशातील दोन पोलीस आपल्यावर पळत ठेवत असल्याची तक्रार केली. ही तक्रार महाराष्ट्राचे डीजीपी यांच्याकडे तोंडी केली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आईचे 2015 मध्ये निधन झाले. तेव्हापासून ते रोज या ठिकाणी जातात. ओशिवारा पोलिसांनी वानखेडे यांची या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज (cctv footage) ताब्यात घेतली आहे.

 

क्रूझवरील पार्टीत आर्यन खान सापडल्याने ही हाय प्रोफाईल केस बनली आहे. एनसीबीची टीम समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नेतृत्वात काम करत आहे. सहा महिन्यात एनसीबीला चार्जशीट फाईल करायची आहे. यामुळे वानखेडेंचा य़ेथील सेवा कालावधी सहा महिन्यांनी वाढविला आहे. त्यांना दुसऱ्यांदा एक्स्टेंशन मिळाले आहे. गेल्या वर्षीच वानखेडे यांना डीआरआयहून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली करण्यात आली होती. वानखेडेंनी दोन वर्षात 17 हजार कोटींचे ड्रग्ज आणि रॅकेट समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) पकडली आहेत.

 

Web Title :- Sameer Wankhede | two police spying ncbs sameer wankhede oral complaint dgp sanjay pandey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वडकी येथे घरावर दरोडा ! मदतीला येऊ नये म्हणून शेजार्‍यांच्या घराला बाहेरुन घातल्या कड्या

Govt. Part Time Employees | सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

Shakti Mohan | एकेकाळी IAS बनण्याचं स्वप्न होतं DID विजेत्या ‘शक्ती मोहन’चं; 36 व्या वर्षी देखील या गोष्टी फॉलो करून रहाते ‘टकाटक’ अन् ‘फिट’