Samir Choughule | समीर चौघुलेंनी प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली ‘हि’ खास पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Samir Choughule | ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते समीर चौगुले सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. समीर आपल्या विनोदी अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला हसवून ठेवत असतात. समीरचा चाहता वर्ग देखील खूपच मोठा आहे. समीरचे पोस्ट सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. नुकतीच समीरने अभिनेता प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय होताना दिसत आहे. (Samir Choughule)
अभिनेता प्रसाद ओक महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये परीक्षक म्हणून काम पाहतो. आज प्रसादचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसानिमित्त समीर चौगुले यांनी त्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मधून त्यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रेतील आठवणींना उजाळा दिला आहे. तर त्याच्या या पोस्टवर प्रसादने देखील कमेंट करत त्याचे आभार मानले. तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Samir Choughule)
समीर चौगुलेने प्रसाद आणि प्रसादची पत्नी मंजिरी सोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की “हॅपी बर्थडे प्रसाद ओक….. अतिशय अफलातून अभिनेता तुम्ही आम्हाला हास्य जत्रेत जे मोटिवेट करता ते खूपच अप्रतिम असत लोकांना असे वाटते कि ते स्क्रिप्टेड आहे. तुमचं वाचन शब्दसंच आणि अत्यंत टोकाची समयसूचकता असल्याशिवाय हे शक्य नाही. तुमच्या अभिनयाबद्दल तर काही वावच नाही. नुकताच आलेल्या धर्मवीर चित्रपटात तुम्ही तुमच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला गाजवले आहे. तर दिग्दर्शक म्हणून चंद्रमुखी सारखे चित्रपट आज तुम्ही प्रेक्षकांना दिले आहेत. मी तुमचा खूप जवळचा मित्र असल्याचा मला अभिमान वाटतो. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना…. लव यू मित्रा”.
तर समीरच्या या पोस्टला प्रसाद ने “थँक्यू डार्लिंग” असे म्हणत कमेंट केली आहे.
तर पत्नी मंजिरीने ही हार्ट इमोजी शेअर करत कमेंट शेअर केली आहे.
सध्या समीर चौगुलेची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
समीर हा उत्कृष्ट अभिनेता आहेच त्याचबरोबर त्याच्या विनोदी अभिनयाने तो आज घराघरात पोहोचला आहे.
समीर चौगुले ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात दिसला होता.
त्याचबरोबर ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात देखील समीरने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
Web Title :- Samir Choughule | prasad oak birthday samir choughule special post for him
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update