बक्कळ संपत्ती कमावल्यानंतर ‘हे’ 5 दिग्गज क्रिकेटर विवाहित महिलेच्या प्रेमात पडले, विरोधाला न जुमानता थाटला विवाह !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   इंडियन क्रिकेट टीममध्ये असे काही टॉपचे खेळाडू आहेत जे विवाहित महिलेच्या प्रेमात पडले आणि कसलाही विचार न करता त्यांनी लग्नही केलं आहे. अशाच काही क्रिकेटर्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) शिखर धवन –  शिखर धवन यानं ऑस्ट्रेलियन बॉक्सर आयशा सोबत लग्न केलं. आयशाचा घटस्फोट झाला असून ती 2 मुलींची आई होती. शिखर आणि आयशा यांच्यात 10 वर्षांचा फरक होता. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केलं. त्यांना जोरावर नावाचा एक मुलगा आहे. आयशाच्या दोन्ही मुलीही त्यांच्यासोबत आहेत.

2) मुरली विजय –  दिनेश कार्तिकच्या पत्नीचं आणि मुरली विजय यांचं अफेअर होतं. दिनेश मुरलीचा सहखेळाडू आहे. दिनेश कार्तिक यानं पत्नी निकिता हिला घटस्फोट देताच मुरलीनं तिच्यासोबत लग्न केलं.

3) मोहम्मद शमी –  भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी वेगळे राहतात. आपापल्या आयुष्यात ते सध्या व्यस्त आहेत. 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. याआधीच हसीनचा एक घटस्फोट झाला होता आणि तिला एक मुलगीही होती. शमीनुसार हसीननं तिच्या घटस्फोटाची माहिती लपवली होती सध्या त्यांचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते वेगळे रहात आहेत.

4) व्यंकटेश प्रसाद –  1996 मध्ये व्यंकटेश प्रसाद यानं जयंती सोबत लग्न केलं होतं. जयंतीचं आधीच लग्न झालं होतं आणि घटसफोटही झाला होता. क्रिकेटर मित्र अनिल कुंबळेमुळंच त्या दोघांची भेट झाली होती.

5) अनिल कुंबळे –  दिग्गज क्रिकेटर अनिल कुंबळेला ही एक महिला खूप आवडली होती. हीचं नाव आहे चेतना. चेतनाचे पहिले लग्न एका व्यावसायिकाशी झाले होते. दोघांना एक मुलगीही होती. दोघांचं खटकल्याने चेतना आपल्या मुलीसोबत वेगळी रहात होती. एका ट्रॅव्हल कंपनीत कुंबळे आणि चेतनाची ओळख झाली. कुंबळेला चेतना खूप आवडली. कुंबळेने तिची सर्व माहितीही काढली. तिच्या फिदावर असणाऱ्या कुंबळेने चेतनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. चेतनानेही पतीपासून घटस्फोट घेत कुंबळेसोबत विवाह थाटला. 1 जुलै 1999 रोजी दोघे लग्न बंधनात अकडले.