अशी करा गणेशाच्या प्रतिष्ठापनेची तयारी, ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दहीहंडी नंतर आता सर्वांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. २ सप्टेंबर रोजी सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत. त्यासाठी सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. स्टेज पासून ते देखावा कोणता करायचा याचे सर्वच मंडळांचे नियोजन सुरु आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी गणेशोत्सवाची तयारी सुरु केली आहे.

गणेश स्थापनेसाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे –
चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळी,सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण,समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक , मिठाई , पेढे , गोड पदार्थ

अशी करा गणरायाची स्थापना –
गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रात:स्नान, संध्या, पूजादी नित्यविधी करावेत.
मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ धुऊन त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात.
नंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी.
एकदा मूर्ती स्थापन झाल्यावर ती हलवू नये.
‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं.
कलश, शंख, घंटा व दीप यांना गंध अक्षता – पुष्प अर्पण करावं.
नंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा
मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणावेत.

गणरायाची स्थापना करताना गणरायाला अक्षदा वाहाव्यात. तसेच जानवे श्री गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे. तसेच फुले, दुर्वा, शमी व अन्य पत्री श्री गणेशांना अर्पण कराव्यात. सर्व बाबी करून झाल्यानंतर गणेशाची आरती करून सर्वांना प्रसाद द्यावा.

आरोग्यविषयक वृत्त –