Samruddha Jeevan Scam | ‘समृद्ध जीवन’ घोटाळ्यातील महत्त्वाच्या कागदपत्रांचा दुसरा साठा CID कडून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – देशातील अनेक राज्यातील हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या समृद्ध जीवन घोटाळ्यातील (Samruddha Jeevan Scam) अनेक कागदपत्रे यापूर्वी जप्त करण्यात आली आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) या गुन्ह्याचा तपास करताना आजवर लपवून ठेवलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा दुसरा साठा देखील जप्त केला आहे. समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणातील (Samruddha Jeevan Scam) कागदपत्रांचा पहिला साठा आठवड्यापूर्वी नऱ्हे येथून जप्त केला होता.

samruddha jeevan scam | second stock of samruddha jeevan important documents seized by crime investigation department of maharashtra

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (crime investigation department maharashtra) या प्रकरणातील दुसरा साठा पुणे शहरातील धायरी (dhayari pune) येथून जप्त केला आहे. सीआयडीने नऱ्हे येथील एका सोसायटीतून कागदपत्र जप्त केल्यानंतर बुधवारी धायरी येथील एका घरावर छापा टाकला. या घरामध्ये आजवर लपवून ठेवलेल्या मोठ्या कागदपत्रांचा साठा सीआयडीच्या हाती लागला आहे. मोठ्या प्रमाणात कागदपत्रे मिळून आल्याने ती पुढील तपासाकरिता जप्त करण्यात आली. संबंधित कागदपत्रांचे विश्लेषण केल्यानंतच आवश्यक ती माहिती सीआयडीला मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.

शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत यामधून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महेश मोतेवार (Mahesh Motewar) व त्याच्या कंपनीतील साथीदारांनी देशातील अनेक राज्यातील लोकांची फसवणूक केली. याप्रकरणी महेश मोतेवार विरोधात देशातील 22 राज्यात 28 गुन्हे दाखल आहेत.

समृद्ध जीवन घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. या गुन्ह्यामध्ये एकूण 25 बड्या व्यक्तींचा सहभाग असून 17 जणांना सीआयडीने अटक केली आहे. तर 8 जण फरार आहेत. महेश मोतेवार सध्या ओरीसामधील कारागृहात आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक संदिप दिवाण (Superintendent of Police Sandeep Diwan) यांच्यामार्फत केला जात आहे. पोलीस उपअधीक्षक मनीषा धामणे पाटील (Deputy Superintendent of Police Manisha Dhamne Patil) यांनी कागदपत्रांचा दुसरा साठा जप्त केला.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मनीषा धामणे पाटील, पोलीस निरीक्षक सीताराम फंड, विठ्ठल
पवार, सहायक पोलीस निरीक्षक अरुण मोरे, विकास कोळी, सचिन उबाळे, महेंद्र तुपे, आशा जाधव,
कविता नाईक, दिपाश्री साळुंके, भाग्यश्री मोहिते, ज्योती धनुरकर, दिपाली चव्हाण, माधुरी मोरे,
सारीका कुंभार या पथकाने केली.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठे बदल, 44402 रुपये झाला 22 कॅरेटचा भाव; जाणून घ्या

High Court | अनौरस (नाजायज) आई-वडील असू शकतात परंतु मुलं नव्हे – उच्च न्यायालय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  samruddha jeevan scam | second stock of samruddha jeevan important documents seized by crime investigation department of maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update