Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, कार जळून खाक; पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. समृद्धी महामार्ग सुरुवातीपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) लोकार्पण झाल्यापासून अपघातासह (Accident) वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच या महामार्गावर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कार जळून खाक झाली. मात्र सुदैवाने यात कार चालक आणि प्रवासी सुरक्षीत असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) नागपूर -शिर्डी (Nagpur-Shirdi Highway) या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडलं. परंतु उद्घाटनानंतर या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु झाल्याने हा मार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळ एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. आग भडकल्याने कार काही क्षणात जळून खाक झाली. ही कार पुण्यातील (Pune) नितीन सिंह राजपूत (Nitin Singh Rajput) यांची असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, राजपूत कुटुंब समृद्धी महामार्गावरुन शिर्डी मार्गे पुण्याला जात होते. वैजापूरच्या गलांडे वस्तीजवळ कार येताच गाडीतून धूर निघत असल्याचे राजपूत यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी करुन कार रस्त्याच्या कडेला उभी केली. खाली उतरून गाडीची पाहणी केली असता गाडीच्या समोरील भागात आग लागल्याचे दिसले.

त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडीत बसलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढेल.
अवघ्या काही मिनिटात आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण गाडीने पेट घेतला.
या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. राजपतू यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात (Aurangabad Rural Police Station) नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Samruddhi Highway | car caught fire on samriddhi highway the family in pune narrowly escaped

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sarla Ek Koti | सरला एक कोटीमध्ये ईशा केसकर मुख्य भूमिकेत!

Rajabhau More Passes Away | मराठी मनोरंजन सृष्टीतून वाईट बातमी; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन

Kiff 2022 | अमिताभ बच्चन यांच्या बद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले ‘हे’ मोठे विधान