Samruddhi Kelkar | अभिनेत्री समृद्धी केळकर लवकरच करणार ‘या’ मालिकेतून कमबॅक; साकारणार दमदार भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Samruddhi Kelkar | स्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून आयपीएस कीर्ती अर्थातच अभिनेत्री समृद्धी केळकर घराघरात पोहोचली होती. समृद्धीने तिच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका बंद झाल्यानंतरही चाहते मात्र या कलाकारांना मिस करत होते. आता समृद्धीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे समृद्धी लवकरच टीव्हीवर कमबॅक करणार आहे. (Samruddhi Kelkar)

 

फुलाला सुगंध मातीचा ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच टॉप फाईव्ह मध्ये स्थान निर्माण केले होते. आता मालिकेतील समृद्धी केळकर पुन्हा एकदा टीव्हीवर झळकणार असल्याने चाहते तिला पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

 

यंदा समृद्धी केळकर एक सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअरचा’ या शोमध्ये समृद्धी लवकरच झळकणार आहे.
या शोमध्ये अभिनेता अंकुश चौधरी परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोचा नवा प्रोमो रिलीज झाला.
ज्यामध्ये अंकुश, फुलवा खामकर आणि समृद्धी दिसून येत आहेत.

 

Web Title :- Samruddhi Kelkar | phulala sugandh maticha fame samruddhi kelkar come back on tv with new show

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shreyas Talpade | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी श्रेयस तळपदेने दिली ‘हि’ मोठी हिंट; पोस्ट वायरल

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

Gandhi Godse-Ek Yudh | ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी अभिनेत्री रेखाने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो वायरल