Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर अपघाताचा सिलसिला सुरुच; भरधाव इरटिका दुभाजकाला धडकून ६ जण ठार

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) दररोज अपघाताचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. मेहकर -सिंदखेड राजा दरम्यान भरधाव इरटिका (Ertiga Car) गाडीने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडेआठ वाजता लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ घडला. यातील सर्व जण छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील रहिवाशी आहेत. अपघातातील (Samruddhi Mahamarg Accident) जखमींना प्रथम मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून गंभीर जखमींना तेथून अन्यत्र हलविण्यात येत आहेत.

 

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इरटिका कार नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. गाडीत तब्बल १३ जण होते. भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले व गाडीने दुभाजकाला धडक दिली. त्यामुळे तिने ३ ते ४ पलट्या मारुन विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर जाऊन उलटली. त्यात चार जण जागीच ठार झाले. तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यु झाला. जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे.

Web Title :  Samruddhi Mahamarg Accident | Accidents continue on Samriddhi Highway;
6 killed after speeding Irtica collides with divider

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MC Stan | ‘बिग बॉस’ फेम एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Pune Police Inspector Transfer | ‘फरासखाना’चे वरिष्ठ पो. निरीक्षक शब्बीर सय्यद यांची बदली तर
कोंढव्यात पो. निरीक्षक संदीप भोसले यांची नियुक्ती

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर