Samruddhi Mahamarg Accident | दुर्देवी ! समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

बुलढाणा : पोलीसनामा ऑलनाइन – Samruddhi Mahamarg Accident | जिल्हयातील सिंदखेडराजा (sindkhed raja) तालुक्यातील दुसरबीड येथून मजूरांना घेऊन समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg Accident) कामावर जाताना झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. समृध्दी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. लोखंडी सळई घेवुन जाणारा ट्रक पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

समृध्दी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) काम करणार्‍या बिहारी मजूरांची मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव येथे हा भीषण अपघात झाला आहे. जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ट्रकमध्ये 15 मजूर होते त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर पोलिस आणि इतरांनी बचावकार्यास सुरूवात केली आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | 6 KG वजनाची मूर्ती सोन्याची असल्याचे भासवून सराफाची फसवणूक; कात्रजमधील निलेश धुमाळ अटकेत

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी येऊनही 9 हजारांनी ‘स्वस्त’, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर

Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेकराराने देण्यास स्थायी समितीची मान्यता; पुण्यातील संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Ajit Pawar | ‘नमो’ मंदिराबाबत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी, म्हणाले – ‘पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही’

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update