‘या’ कारणामुळं CM ठाकरेंची महत्त्वाकांक्षी घोषणा हवेतच विरली !

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक घोषणा करत १ मे पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, नागपूर ते शिर्डीपर्यंत करण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारसाठी हि एक महत्त्वाकांक्षी घोषणा होती. मात्र केलेली घोषणा हि हवेतेच विरल्याची दिसून येत आहे. कोरोनाच्या परिणामामुळे अनेक कामे ठप्प झालीय. तसेच या समृद्धी महामार्गावर काम करणारे साधारण ५० टक्के कामगार टाळेबंदीमुळे आपलं हाल होऊ नये यासाठी आपापल्या राज्यात परतले आहे. म्हणून महामार्गावरील कामे थांबली आहेत.

महामार्गाचे काम करणारे मजूर उत्तर प्रदेश, बंगाल, झारखंड या राज्यातील आहेत. कोरोनाच्या धास्तीने त्या स्थलांतरित मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. तर नागपूर पासून मुंबई असा ७०१ .किमीचा हा महामार्ग आहे. हा महामार्गामुळे महाराष्ट्रातील साधारण २४ जिल्हे जोडले जगेल आहेत. तसेच इंटरचेंजद्वारे जवळपास १४ जिल्हे जोडले आहे. यामधील जो १ मे पासून प्रारंभ होणार होता तो प्रथम टप्पा नागपूर पासून शिर्डी सुमारे ५२० किलोमीटरचा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडून ५ डिसेंबर २०२० मध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातमधून जाणार्‍या रस्त्यावर कारमधून आणि नंतर हेलिकॉपरमधून देखील पहाणी करण्यात आली होती.

रखडलेल्या महामार्गाबद्दल मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले म्हणजे, १ मेपासून नागपूर पासून ते शिर्डीपर्यंतचा प्रवास खुला केला जाणार आहे. मात्र कोरोनाच्या विषाणूमुळे आणखी एकदा संकट आला आहे. आणि रस्त्याच्या अनेक ठिकाणचे पुलाचे कामकाज अदयाप अपुरे आहेत. समृद्धी महामार्गाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यानी नावं न घेण्याच्या अटीवर माहिती दिली अशी की, ‘कोव्हीड कालावधीत आणखी एकदा टाळेबंदी लागल्यामुळे झारखंड, पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश मध्यप्रदेश या राज्यातील मजूर, कामगार त्यांच्या गावी परतल्याने कामे थांबली आहेत. म्हणून हा महामार्ग पूर्ण झाल्यास विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा थेट मुंबईची संबंध येऊ शकतो, यामुळे सर्व शेतकरी आणि नागरिकांनी महामार्ग पूर्ण करावा अशी मागणी केली आहे.