Samsung चा सेल, TV खरेदी करा आणि मिळवा स्मार्टफोन-साऊंडबार फ्री, जाणून घ्या डील्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सॅमसंगने बिग टीव्ही डेज सेलचे आयोजन केले आहे. हा सेल 31 जानेवारी, 2021 पर्यंत सुरू राहील. या सेलमध्ये कंपनी 55-इंच आणि त्यापेक्षा मोठ्या प्रीमियम टीव्ही मॉडल्सवर डील्स आणि डिस्काऊंट्स देत आहे. ग्राहकांना ऑफर्सचा लाभ देशभरातील सर्व प्रमुख कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सकडून घेता येईल.

सॅमसंगने म्हटले आहे की, या सेलच्या दरम्यान ग्राहकांना लार्ज-स्क्रीन टीव्ही मॉडल्स खरेदी केल्यास ऑफर्सचा लाभ मिळेल. यासाठी ग्राहकांना 55-इंच, 65-इंच, 75-इंच, 82-इंच आणि 85-इंच साइजमध्ये QLED TV, क्रिस्टल 4K UHD आणि QLED 8K TV मॉडल्स खरेदी करावे लागतील. सोबतच ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅक, एक्सटेंडेड वॉरंटी ऑफर्स आणि 1,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीवर ईएमआयचा फायदा सुद्धा मिळेल.

सॅमसंग इंडियाने म्हटले आहे की, या सेलच्या दरम्यान 65-इंच QLED TV आणि 75-इंच क्रिस्टल 4K UHD TV खरेदी केल्यास 22,999 रुपये किंमतीचा Galaxy A51 स्मार्टफोन मिळेल.

तर, ग्राहकांना QLED TV च्या 55-इंच मॉडल आणि 65-इंच क्रिस्टल 4K UHD TV वर 18,999 रुपयांचा Galaxy A31 स्मार्टफोन फ्री मिळेल.

या शिवाय कंपनीने म्हटले आहे की, 75-इंच, 82-इंच किंवा 85-इंच QLED TV खरेदी करणार्‍या ग्राहकांना 48,990 रुपयांच्या व्हॅल्यूचा Soundbar HW-Q800T किंवा 99,990 रुपयांच्या किमतीचा Soundbar HW-Q900T फ्री मिळेल.

शेवटी कंपनीने म्हटले की, QLED TVs वर ग्राहकांना 10-ईयर नो स्क्रीन बर्न-इन वॉरंटी, 1-ईयर कम्प्रेसिव्ह वॉरंटी आणि पॅनलसाठी 1-ईयर अ‍ॅडिशनल वॉरंटीचा लाभ मिळेल.