खुशखबर ! सॅमसंगच्या स्मार्टफोन आणि टीव्हीवर 55% ‘डिस्काउंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्सवांच्या काळात अनेक कंपन्या आपल्या उत्पादनावर आकर्षक ऑफर देत असतात. सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. त्यात दक्षिण कोरियाच्या सॅमसंग या मोबाईल फोन तयार करणाऱ्या कंपनीने फेस्टिवल सीजन चालू केला आहे. सॅमसंग ने बनवलेल्या टीव्ही, होम साहित्य, स्मार्टवॉच, आणि अ‍ॅक्सेसरीजवर सुमारे ५५ टक्के डिस्काउंट भेटणार आहे.

ओयो कडून मिळणार १० हजारचे व्हाउचर
कंपनीने तयार केलेल्या उत्पादनावर ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर भेटणार आहेत. उत्सवाच्या काळात जर ऑफर दिल्या तर ग्राहक उत्पादने खरेदी करतात हे ओळखून कंपनीने आपल्या अनेक उत्पादनावर भरघोस डिस्काउंट देऊ केला आहे. सोबतच तुम्हाला ओयोकडून १० हजार रुपयांपर्यंतचे व्हाउचर्स दिले जाणार आहे.

निवडक स्मार्ट फोनवर आकर्षक ऑफर
सॅमसंग स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी फोन एक्सचेंज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देत आहे. सॅमसंगच्या काही निवडक उत्पादनांवर जसे की, Galaxy Note 9, Galaxy A80, Galaxy Note 10, Galaxy S10+ यावर अतिशय चांगला डिस्काउंट मिळत आहे. तसेच सेल मध्ये हर्मन कार्डन आणि जेबीएलच्या ऑडिओ वर चांगला डिस्काउंट मिळणार आहे. आकर्षक ऑफर या मर्यादित काळासाठी असणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –