चीनी कंपन्यांना मागे टाकत 6G नेटवर्कच्या तयारीत SAMSUNG

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीन 5जी नेटवर्क विकसित करण्यात गुंतलेला आहे तर सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आता 6 जीची तयारी करत आहे. सॅमसंगचे म्हणणे आहे की, 6जी चे कमर्शलायजेशन 2028 पर्यंत होईल. हे मेनस्ट्रीममध्ये आणण्यात आजपासून सुमारे 10 वर्ष लागतील. म्हणजे 2030 पर्यंत 6जी नेटवर्क मेनस्ट्रीममध्ये येऊ शकते. यापूर्वी कंपनीने एक व्हाईट पेपर रिलिज केला. यामध्ये कंपनीने 6जी व्हिजनबाबत सांगितले आहे. या पेपरचे शीर्षक कंपनीने ’द नेक्स्ट हायपर कनेक्टेड एक्सपिरियन्स फॉर ऑल’ असे ठेवले आहे. पेपरमध्ये कंपनीने टेक्निकल आणि सोशल मेगाट्रेड्स, नवी सर्व्हिस, रिक्वायरमेंट बाबत सांगितले आहे.

6जी नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी 10 वर्षे लागणार
सॅमसंगचे म्हणणे आहे की, 5जी नेटवर्क आता सुरूवातीच्या टप्प्यात आहे. अशावेळी 6जी नेटवर्कची तयारी आतापासून करणे चांगले ठरू शकते. कंपनीनुसार नेक्स्ट जेनरेशन कम्यूनिकेशन नेटवर्कल डेव्हलप करण्यात एक दशकाचा कालावधी लागतो. अशात जर आतापासून 6जी नेटवर्कची तयारी सुरू केली तर ठरलेल्या वेळेत नेटवर्क डेव्हलप केला जाऊ शकते.

6जीसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट लाँच
अ‍ॅडव्हान्स कम्यूनिकेशन रिसर्च सेंटरचे हेड सूंग ह्यूं चोई यांनी म्हटले की, कंपनीने 6जी नेटवर्कसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम लाँच केला आहे आणि या दिशेने कंपनी सर्व जरूरी डेव्हलपमेंटवर काम करत आहे.

5जी नेटवर्कपेक्षा 10 पट वेगवान असेल 6जी
यापूर्वी एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, जपान 6जी नेटवर्क स्टँडर्डची तयारी करत आहे. निकीच्या एका रिपोर्टनुसार जपानने 6जी नेटवर्कची आऊट लाईन तयार केली आहे. परंतु 5जी नेटवर्क टेक्नॉलॉजीमध्ये जपान जगातील अनेक देशांच्या मागे आहे. जपानचे 6 जी नेटवर्क सध्याच्या 5जी पेक्षा 10 पट वेगवान असेल. सध्या जगात बहुतांश देश 5 जी डेव्हलप करत आहेत. 5जी नेटवर्क अडॉप्ट करण्यात जपान अनेक देशांच्या मागे आहे.