Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 ची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच झाली लीक : रिपोर्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  युरोपियन बाजारामध्ये लॉन्च होण्यापूर्वी सॅमसंग गॅलेक्सी ए52 (Samsung Galaxy A52) आणि सॅमसंग गॅलेक्सी ए72 (Samsung Galaxy A72) स्मार्टफोनच्या किंमती लीक झाल्या आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए52 स्मार्टफोन आणि सॅमसंग गॅलेक्सी ए72 स्मार्टफोन कथितपणे German price comparison साइटवर लिस्ट झाले आहेत, जिथे फोनच्या किंमती त्यांच्या आधीच्या स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए51 (Samsung Galaxy A51) आणि गॅलेक्सी ए71 (Galaxy A71) सारख्याच दिसत आहेत. आगामी मिड-रेंज फोन या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केले जाऊ शकतात.

गॅलेक्सी क्लब (Galaxy Club) च्या अहवालात दावा करण्यात आला आहे की Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 स्मार्टफोनची युरोपियन किंमत जर्मन प्राइस कम्पॅरिझन साइट इडियालो (Idealo) वर लिस्ट केली गेली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A52 किंमत (expected)

अहवालानुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए52 4जी फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत युरोपमध्ये EUR 369 (सुमारे 32,700 रुपये) असेल. त्याच वेळी, त्याच्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR 429 (सुमारे 38,000 रुपये) असेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 5जी व्हेरिएंटच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत युरोपमध्ये EUR 459 (सुमारे 40,700 रुपये) असेल. त्याच वेळी, त्याच्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR 509 (सुमारे 45,100 रुपये) असेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए72 किंमत (expected)

सॅमसंग गॅलेक्सी ए72 4जी स्मार्टफोनबद्दल सांगायचे झाले तर, रिपोर्टनुसार त्याच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत युरोपमध्ये EUR 449 (सुमारे 39,800 रुपये) असेल. त्याच वेळी, त्याच्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR 509 (सुमारे 45,100 रुपये) असू शकते.

अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टद्वारे असे संकेत मिळाले होते की सॅमसंग गॅलेक्सी ए72 च्या 5जी ची किंमत $600 (सुमारे 43,900 रुपये) असेल. रिपोर्टमध्ये असे देखील म्हटले गेले होते की हा सॅमसंग फोन मार्च 2021 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यासह, गेल्या काही आठवड्यांपासून सॅमसंग गॅलेक्सी ए52 स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झालेला आहे आणि या फोनबाबत असे देखील म्हटले जात आहे की 2021 च्या पहिल्या तिमाहीत हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो.