स्वस्त बँड : झोपेचा पॅटर्न, स्ट्रेस लेव्हलवर ठेवेल नजर सॅमसंगचे फिटनेस बँड गॅलेक्सी फिट 2, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सॅमसंगने आपले लेटेस्ट फिटनेस बँड गॅलेक्सी फिट 2 भारतात लाँच केले आहे. दक्षिण कोरियन टेक कंपनीने हे याच महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या लाईफ अनस्टॉपेबल व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये शोकेस केले होते. कंपनीचा दावा आहे की, गॅलेक्सी फिट 2 अमोलेड डिस्प्लेसोबत येते. एकदा चार्ज केल्यानंतर हे 21 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते. यामध्ये अनेक प्रकारचे वर्कआऊट मोडसुद्धा मिळतात.

कोरोना व्हायरस महामारी लक्षात घेता, यामध्ये हँड वॉश फिचरसुद्धा जोडलेले आहे, जे वेळोवेळी हात धुण्याची आठवण करून देईल. सॅमसंग गॅलेक्सी फिट 2 फिटबँड 5 एटीएम वॉटर रेसिस्टन्स आहे आणि हे दोन कलर ऑपशनमध्ये मिळते.

सॅमसंग गॅलेक्सी फिट 2 : भारतात किंमत आणि उपलब्धता
*
भारतात याची किंमत 3,999 रुपये आहे. ब्लॅक आणि स्कारलेट कलरमध्ये मिळते.
* हे अमेझॉन, सॅमसंग डॉट कॉम आणि ऑफलाइन खरेदी करता येते.

स्पेसिफिकेशन आणि फिचर्स
*
सॅमसंग गॅलेक्सी फिट 2 मध्ये 1.1 इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे, जो चांगल्या व्हिजिबिलिटीसाठी 450नीट्सचा ब्राइटनेस देतो.

* हे एक फ्रंट टच बटनसोबत येते, जे ईजी नेविगेशन आणि वेक-अप, रिटर्न टू होम आणि कँन्सल सारखे सिम्पल फंक्शन्ससाठी सक्षम आहे.

* यूजर्स 70 पेक्षा जास्त डाऊनलोड केलेल्या वॉच फेसेससोबत गॅलेक्सी फिट 2 ला कस्टमाइज करू शकतात आणि एकावेळी 12 डेडिकेटेड विजेट सेट करू शकतात.

* गॅलेक्सी फिट 2 सॅमसंग हेल्थ अ‍ॅपपासून पाच ऑटोमॅटिक वर्कआऊट आणि सॅमसंग हेल्थ अ‍ॅपच्या प्रीसेटच्या माध्यमातून हे जवळपास 90 पेक्षा जास्त वर्कआऊटला ट्रॅक करते.

* हे स्लीप स्कोअर अ‍ॅनालिसिससोबत येते, जे तुमच्या झोपेच्या पॅटर्नला चार टप्प्यात – वेक, आरईएम, लाईट आणि डीपच्या माध्यमातून ट्रॅक करते.

* यामध्ये स्ट्रेस ट्रॅकिंगची सुद्धा सुविधा आहे, जे यूजरच्या तणावाच्या स्तरावर नजर ठेवते आणि हाय स्ट्रेस लेव्हल आढळल्यास एका ब्रीदिंग गाईडचा सल्ला देते.

* हे तुमच्या फोनच्या म्यूझिक प्लेयरवर क्विक अ‍ॅक्सेससुद्धा देते.

* गॅलेक्सी फिट 2 फिटबँड 5 एटीएम वॉटर रेसिस्टन्स आणि वॉटर लॉक मोडसोबत येते. जे स्विमिंग सेशन किंवा कोणत्याही वॉटर बेस्ड अ‍ॅक्टिव्हीटीसाठी उपयोगी पडते.

* यामध्ये 159 एमएएच बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये रेग्युलर ऑपशन केल्यास 15 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळातो. कमीत कमी फंक्शन वापरल्यास यामध्ये 21 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते. हे केवळ 21 ग्रॅम वजनाचे आहे.