15 दिवसांच्या बॅटरीसह Samsung चा नवीन फिटनेस बँड ‘Galaxy Fit2’ भारतात लाँच, जाणून घ्या ‘किंमत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सॅमसंग (Samsung) ने भारतात लेटेस्ट फिटनेस ट्रॅकर Galaxy Fit2 लाँच केला आहे. यास AMOLED डिस्प्ले आणि 15 दिवसांच्या बॅटरीसह लाँच केले गेले आहे. सॅमसंगने मागील महिन्यात आपल्या ‘लाइफ अनस्टॉपेबल’ व्हर्च्युअल इव्हेंट दरम्यान Galaxy Fit2 लाँच केला होता. Galaxy Fit2 ची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आजपासून कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर, ऑफलाइन स्टोअर आणि अ‍ॅमेझॉन इंडियाकडून ग्राहकांना ते खरेदी करता येणार आहे. हा फिटनेस ट्रॅकर ब्लॅक आणि स्कार्लेट अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

स्पेसिफिकेशन्स बाबत सांगायचं झालं तर त्यात 3D कर्व्ड ग्लास सहित 1.1 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. या डिस्प्लेचा ब्राईटनेस 450 nits आहे. याचे वजन 21 ग्रॅम असून त्यात स्वेट रेसिस्टंट स्ट्रॅप देण्यात आला आहे. Galaxy Fit2 मध्ये 70 वॉच फेसचा सपोर्ट देण्यात आला असून ज्यास डाउनलोड केले जाऊ शकते. यात वेक प्रदर्शन आणि नेव्हिगेशनसाठी एक सिंगल टच देण्यात आला आहे.

Galaxy Fit2 मध्ये पाच स्वयंचलित वर्कआउट्स आणि सॅमसंग हेल्थ लायब्ररीमध्ये 90 पर्यंत वर्कआउट्स दिले गेले आहेत. याव्यतिरिक्त यामध्ये स्लीप ट्रॅकिंग आणि स्ट्रेस ट्रॅकिंग सारखे फीचर्सही दिले गेले आहेत. Galaxy Fit2 मध्ये 5ATM वॉटर रेसिस्टंस देण्यात आले आहे आणि स्विमिंग दरम्यान अ‍ॅक्सिडेंटल अ‍ॅक्टिव्हेशन टाळण्यासाठी वॉटर लॉक मोड देखील देण्यात आला आहे.

हा फिटनेस बँड नोटिफिकेशन्ससाठी प्रीसेट रिप्लायला देखील सपोर्ट करतो. तसेच यात एक म्युझिक कंट्रोलर देखील आहे. याची बॅटरी 159mAh असून कंपनीच्या दाव्यानुसार ती एका चार्जनंतर 15 दिवस चालविली जाऊ शकते.