5500 रूपयांपेक्षा कमी किंमतीत कोणता मोबाईल ‘बेस्ट’ ! सॅमसंग, रेडमी की नोकिया, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय बाजारपेठेत स्वस्तात मस्त आणि कमी बजेट मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन मिळतात. अगदी साडे पाच हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे स्मार्ट फोन खरेदी करता येतील. स्वस्तात कोणता चांगला स्मार्टफोन असेल, ते फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत पाहून आपल्याला ठरवता येईल. दरम्यान, भारतात सॅमसंगने आपला सर्वात कमी किंमतीतला स्मार्टफोन M01 Core बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनची किंमत ५ हजार ४९९ पासून सुरु होते. गुगलच्या गो ऑपरेटिंग सिस्टीमवर हा स्मार्टफोन काम करतो. ऑपरेटिंग सिस्टीम आणि कमी किंमत पाहता हा Nokia 1 आणि शाओमीच्या Redmi Go ला टक्कर देतो. तर आज आम्ही तुम्हाला या तीन फोनपैकी कोणता फोन स्वस्त आणि बेस्ट असेल याबद्दल माहिती सांगणार आहोत.

कोणता स्मार्टफोन स्वस्त

नोकियाचा स्मार्टफोन एकच मॉडेल (१ जीबी + ८ जीबी) मध्ये उपलब्ध असून, फ्लिपकार्टवर त्याची किंमत ४ हजार ६७२ रुपये आहे. तर शाओमीचा रेडमी गो मॉडेलची (१ जीबी + १६ जीबी) किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. सॅमसंग गॅलेक्सी M01 Core स्मार्टफोन दोन मॉडेल मध्ये उपलब्ध आहे. (१ जीबी + १६ जीबी) मॉडेलची किंमत ५ हजार ४९९ रुपये आहे. तर (२ जीबी + ३२ जीबी) मॉडेलची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे.

तीनही स्मार्टफोन मध्ये कोणते प्रोसेसर

नोकिया मध्ये मीडियाटेक ६७३९ प्रोसेसर देण्यात आलं आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी M01 Core स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक ६७३७ प्रोसेसर देण्यात आला आहे. शाओमीच्या Redmi Go मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर दिला आहे. त्यामुळे ह्या तीनही स्मार्टफोन मध्ये कोणता बेस्ट आहे. हे ग्राहक फोन खरेदी करताना ठरवू शकतील.

सॅमसंगचा जबरदस्त डिस्प्ले

सॅमसंगमध्ये ५.३ इंचाचा एचडी + TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रेजॉलूशन ७२०x१४८० पिक्सल आहे. तर नोकियाच्या फोनमध्ये ४.५० इंच IPS डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेजॉलूशन ४८०x८५४ पिक्सल आणि रेडमी गो मध्ये ५.० इंचाचा एवढी डिस्प्ले मिळतो. ज्याचा रेजॉलूशन ७२०×१२८० पिक्सल आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्येच सर्वात चांगला डिस्प्ले आहे. कमी किंमतीत आणि चांगला डिस्प्लेचा फोन खरेदी करणार असाल तर या स्मार्टफोनवर एकदा नजर टाका.

नोकियाचा कॅमेरा कमकुवत

सॅमसंग आणि रेडमी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे. तर नोकिया स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे. सेल्फी कॅमेऱ्यात सॅमसंग आणि रेडमी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर नोकिया १.० मध्ये २ मेगापिक्सचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. फोटो काढण्याची आवड असणाऱ्यांसाठी या फोनमधील कॅमेऱ्यावर एक नजर टाकून फोनची निवड करावी.

रेडमीगो ची दमदार बॅटरी

सॅमसंग आणि रेडमी गो या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ३००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग ने सांगितल्यानुसार, त्यांचा फोन ११ तासांपर्यत टॉकटाईम, तर रेडमीचा दावा आहे की त्यांचा फोनवरुन १२,५ तासांची ४ जीबी कॉलिंग मिळू शकते. नोकियात २१५० mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. नोकियाच्या तुलनेत सॅमसंग आणि रेडमी गो या दोन्ही स्मार्टफोनची बॅटरी क्षमता जास्त आहे. म्हणून साडेपाच हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत फोन खरेदी करण्याचा विचार सुरु असेल तर तीनही फोन एकमेकांना चांगले पर्याय होऊ शकतात.