4GB रॅम आणि 128 GB स्टोरेजचा सॅमसंग Galaxy M30s लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

नवी दिली : वृत्तसंस्था – सॅमसंग कंपनीने आपला ‘M30s’ हा मोबाईल नुकताच लॉन्च केला. या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आई १२८ जीबी स्टोरेजची क्षमता आहे. या आधी सॅमसंगने M30s मध्ये दोन फोन लॉन्च केले होते. त्यामध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा समावेश होता. आताच्या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ६००० एमएच क्षमतेची बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले सुद्धा आहे. फोनचे रिझोल्युशन हे १०८०*२३४० पिक्सल एवढे आहे. हा स्मार्टफोन वन यूआय आणि अँड्रॉइड ९.० पाय ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. कंपनीने या फोनमध्ये ऑक्टाकोर सॅमसंग अक्सिनॉस ९६११ चिपसेट दिला आहे. तर युजर्संना या फोनमध्ये Widevine L1 सर्टिफिकेशन मिळणार आहे. या मुळे युजर्स नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमचे एचडी व्हिडिओ पाहू शकणार आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी M30s चा कॅमेरा :
ह्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप असून,वापरकर्त्यांना ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळणार आहे. तर युजर्संना १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा वापरता येणार आहे.

यामध्ये ब्लूटूथ, वायफाय आणि यूएसबी पोर्ट सारखे फिचर दिली असून, ६००० एमएच क्षमता असलेली बॅटरी आणी १५ वॅट चे फास्ट चार्जिंग फिचर सुद्धा मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M30s ची किंमत :
कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये, ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किमत १४ हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल.