25 फेब्रुवारीला भारतात लॉंच होणार Samsung Galaxy M31

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Samsung Galaxy M31 हा मोबाइल भारतात 25 फेब्रुवारी रोजी लॉंच होणार आहे. कंपनीच्या अधिकृत साईटद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. Galaxy M30 या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. Galaxy M31 च्या रिअर मध्ये कॉड कॅमेरा सेटप मिळेल. हा कॅमेरा मोड्यूल रेग्युलर शेप वाला असेल.

Galaxy M31 मध्ये गेल्या वर्षी Galaxy M सिरीजमध्ये दिला गेलेला ग्रेडिएंट बँक फिनीशींमध्ये पहायला मिळेल. अधिकृत साईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy M31 ला भारतात 25 फेब्रुवारी रोजी लॉंच केले जाईल.

Galaxy M31 या स्मार्टफोनमध्ये फुल-HD+ सुपर AMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा असेल तसेच यामध्ये रिअर फिंगरप्रिंट देखील देण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त Samsung Galaxy M31 मध्ये 6,000mAh ची बॅटरी मिळणार आहे. जी की खूप दमदार असेल तसेच Galaxy M30 मध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाणार आहे. मात्र सध्या या दोनीही फोनच्या किमतीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.