फायद्याची गोष्ट ! सॅमसंग गॅलेक्सी M31 फोनचा आज पहिला ‘सेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात आज सॅमसंग (Samsung) ने लाँच केलेला स्मार्टफोन Samsung Galaxy M31 चा आज पहिला सेल आहे. या फोन ची भारतात किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये मेगा कॅमेरा, मेगा बॅटरी आणि मेगा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये एकूण ५ कॅमेरे देण्यात आले आहेत. पाठीमागे ४ कॅमेरे आणि सेल्फीसाठी फ्रंटला एक कॅमेरा दिला आहे. सॅमसंगच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज असणारा हा मोबाईल आहे. या फोनचा सेल आज दुपारी १२ वाजेपासून सुरू झाला आहे.

दोन रंगाच्या पर्यायात स्मार्टफो उपलब्ध

हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. ओशन ब्लू आणि स्पेस ब्लॅक या दोन रंगात हा फोन उपलब्ध असणार आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनचे वजन १९१ ग्रॅम आहे. या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६.४ इंचाचा इन्फिनिटी U FHD+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

फोनच्या बॅकला ४ कॅमेरे दिले आहेत. फोनच्या मागे ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनच्या बॅटरीत २९ तास व्हिडिओचा प्लेबॅक, ४९ तासांचा व्हाईस कॉल आणि १३१ तासांचा म्युझीक प्लेबॅक सपोर्ट करीत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगसह ६,००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम३१ मध्ये 4K व्हिडिओ रिकॉर्डिंग, हायपरलॅप्स, स्लो मोशन आणि सुपर स्टेडी मोड्स सह जबरदस्त व्हिडिओ कॅपबिलिटीज देण्यात आली आहे.फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ४ के, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्लो मोशन सेल्फीजला सपोर्ट करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.