सॅमसंगच्या ‘या’ पॉवरफूल स्मार्टफोनचे नवे ‘व्हेरिअंट’ बाजारात, 30 मिनिटात चार्ज झालेली ‘बॅटरी’ दिवसभर टिकणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सॅमसंगने आपला पॉवरफुल स्मार्टफोन Galaxy S10 Lite काही दिवसांपूर्वी लॉन्च केला आहे. आता या स्मार्टफोनचे एक नवीन व्हेरिअंट आणले आहे. कंपनीने हा फोन 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजच्या नवीन व्हेरिअंटमध्ये आणला आहे. आतापर्यंत फोन केवळ 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. हा फोन प्रिज्म ब्ल्यू, प्रिज्म व्हाइट आणि प्रिज्म ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध करुन दिला जाईल.

फोनचे फीचर्स –
हा फोन 1 मार्चपासून रिटेल स्टोअर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, सॅमसंग ई-शॉप आणि मुख्य ऑनलाइन पोर्टल्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज डिस्काऊंट ऑफर मिळू शकते. यात फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा लावण्यात आला आहे. यात मुख्य कॅमेरा 48 मेगा पिक्सलचा आहे तर 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सचा मॅक्रो कॅमेरा आहे.

सेल्फीमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये सुपर स्टेडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानासह भारतात लॉन्च होणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले. या टेक्नॉलॉजीमुळे ग्राहकांना कॅमेऱ्याचा उत्तम अनुभव मिळेल.

स्टोरेज –
यात मायक्रो एसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज मेमरी 1 टीबी पर्यंत वाढवता येते. यात 6.7 इंच फुल HD+ सुपर AMOLED Infintiy-O डिस्प्ले देण्यात आला आहे. याबरोबरच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला असून 25W सुपर चार्जरसह 4,500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फक्त 30 मिनिटांच्या सुपर फास्ट चार्जिंगनंतर फोनची बॅटरी दिवसभर टिकेल असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

किंमत –
8GB रॅम आणि 512GB स्टोरेज असणाऱ्या या व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये आहे तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे.