Samsung चा 3 कॅमेर्‍यांचा फोन खरेदी करा अन् मिळवा आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, सोबत 6000 mAh ची बॅटरी

Samsung Galaxy M30s : सॅमसंगचा पॉप्युलर ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन Galaxy M30s अमेझॉनवर आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. अमेझॉनवर दिलेल्या माहितीनुसार हा फोन डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफरमध्ये सुद्धा मिळू शकतो. अमेझॉन पेजवर लिहिले आहे, lowest price ever, याचा अर्थ फोन आतापर्यंच्या सर्वात कमी किमतीत विकला जात आहे. हा फोन 15,500 रुपयांऐवजी केवळ 12,999 रुपयात खरेदी करता येईल.

याशिवाय एक्सचेंज ऑफरअंतर्गत यावर 10,550 रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय फोन खरीदी करण्यासाठी येस HSBC कॅशबॅक कार्डचा वापर केल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

असे आहेत फोनचे फिचर्स…

Samsung Galaxy M30s

यामध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) इन्फिनिटी यू डिस्प्ले आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो 91 टक्के आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर एक्सीनॉस 9611 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो.

48 MP चा जबरदस्त कॅमेरा, 3 रियर कॅमेरे

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी एम30एसमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे. हा एफ/ 2.0 अपर्चरच्या लेन्ससह येतो. याच्यासह 5 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आहे. फोनमध्ये फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 व्होल्टची फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.