खुशखबर: Samsung नं ‘स्मार्टफोन’सह इतर प्रोडक्टवर मिळणाऱ्या ‘वॉरंटी’स वाढविले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांच्या सोयी लक्षात घेता स्मार्टफोनसह इतर उत्पादनांवर मिळणाऱ्या वॉरंटीला 15 जून पर्यंत वाढविले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना लॉकडाऊन दरम्यान वॉरंटी संपण्याच्या त्रासाचा सामना करावा लागणार नाही. कंपनीने याअगोदरही एप्रिलमध्ये जवळपास सर्व उत्पादनांची वॉरंटी वाढविली होती.

सॅमसंग इंडियाने म्हटले आहे की आम्ही जवळपास सर्व उत्पादनांची वॉरंटी 15 जूनपर्यंत वाढविली आहे. याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. कंपनी पुढे म्हणाली की सद्यस्थिती लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, 20 मार्च ते 31 मे दरम्यान ज्यांनी खरेदी केली आहे त्या ग्राहकांना वाढीव वॉरंटीचा फायदा देण्यात येईल.

सॅमसंगने नुकतेच भारतात एम सीरिजचे लेटेस्ट स्मार्टफोन गॅलेक्सी एम01 आणि एम11 ला लॉन्च केले. या दोन्ही नवीन स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. ग्राहक हे स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइट अ‍ॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकतात. वैशिष्ट्यांविषयी बघितले तर कंपनीने दोन्ही डिव्हाइसमध्ये एचडी डिस्प्ले, पॉवरफुल बॅटरी, उत्कृष्ट कॅमेरे आणि शक्तिशाली प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे.