सॅमसंगचा ‘हा’ फोल्डेबल फोन आज अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी

पोलीसनामा ऑनलाईन : 9 जुलै रोजी सॅमसंग त्याच्या प्लॅटफॉर्मवर 12PM आणि 6PM दरम्यान Galaxy Hours flash सेलचे आयोजन करीत आहे. या फ्लॅश सेलदरम्यान, कंपनी सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून गॅलेक्सी झेड फ्लिप खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 50 टक्के कॅशबॅक ऑफर करेल. म्हणजेच, हा फोल्डेबल फोन अर्ध्या किंमतीवर ग्राहक प्रभावीपणे खरेदी करू शकतील. परंतु आगामी विक्रीतील केवळ तीन भाग्यवान ग्राहकांना गॅलेक्सी झेड फ्लिप खरेदी केल्यावर 50 टक्के कॅशबॅक मिळेल.

या व्यतिरिक्त, कंपनीच्या फ्लॅश सेलमध्ये गॅलेक्सी झेड फ्लिप खरेदी केलेल्या सर्व ग्राहकांना 1 वर्षासाठी वन- टाइम अपघाती नुकसान संरक्षण सेवा दिली जाईल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना झिरो कॉस्टवर गॅलेक्सी एश्योर्ड प्लान देखील मिळेल. जी ग्राहकांना त्यांच्या डिव्हाइसची 70 टक्के किंमत मिळण्याची हमी देते. गॅलेक्सी झेड फ्लिपवर लाभ देण्याशिवाय, सॅमसंग आगामी सेलमध्ये स्मार्टफोन, वेअरेबल्स, टॅब्लेट आणि अ‍ॅक्सेसरीज सारख्या गॅलेक्सी उत्पादनांवरही सूट देत आहे.

सेल अंतर्गत ग्राहकांना एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि सिटी बँक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 6,000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकेल. याशिवाय जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 8,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त एक्सचेंज व्हॅल्यूही ग्राहकांना मिळतील. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिपची किंमत भारतात 1,09,999 रुपये आहे. हे मिरर पर्पल, मिरर ब्लॅक आणि मिरर गोल्ड कलर ऑप्शन्स मधील ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.