‘Samsang’चे ‘दृष्टीहीनासाठी’ विशेष ‘अ‍ॅप’, त्यांना मिळणार मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सॅमसंगने दोन नवे विशेष अ‍ॅप सादर केले आहेत, या अ‍ॅपचे नाव आहे गुड वाइब्स (Good Vibes) आणि रिल्यूमिनो (Relumino). हे अ‍ॅप ऐकायला न येणाऱ्या किंवा सक्षमपणे पाहू न शकणाऱ्यांना उपयोगी ठरतील. त्यांच्यासाठी हे अ‍ॅप एक कम्युनिकेशन टूल्स म्हणून काम करतील. सॅमसंग आपल्या सिटीजनशीप प्रोग्राम अंतर्गत हे अ‍ॅप आणले आहेत.

दृष्टीहीनांसाठी उपयुक्त अ‍ॅप –
Good Vibes ला सॅमसंगच्या इंडिया टीमने तयार केले आहे. हे अ‍ॅप मॉर्स कोडच्या माध्यमातून वायब्रेशनला टेक्स्ट मध्ये आणि टेक्स्टला वायब्रेशनमध्ये बदलेलं. त्यामुळे संवाद साधणे सोपे होईल. डेफ ब्लाइंड (अंध) व्यक्ती स्मार्टफोनमध्ये डॉट्स आणि डॅशेजच्या कॉम्बिनेशनचा वापर मेसेज पाठवण्यासाठी करु शकतात, जे दुसऱ्या व्यक्तीला टेस्क्टच्या स्वरुपात मिळेल. जेव्हा एखादा व्यक्ती डेफ ब्लाइंड व्यक्तीला टेक्स्ट किंवा वाइस मेसेज पाठवेल तेव्हा तो मॉर्स कोडमध्ये वायब्रेशनच्या स्वरुपात मिळेल. त्यामुळे अंध व्यक्ती तो मेसेज लगेच समजू शकतो. हे अ‍ॅप सॅमसंग गॅलेक्सी स्टोरवर उपलब्ध आहे आणि लवकर हे अ‍ॅप दुसऱ्या अ‍ॅड्राइड यूजर्सला देखील उपलब्ध होईल.

रिल्यूमिनो हे अ‍ॅप कमी दृष्टी असलेल्यांसाठी आहे, ज्यात कंपनीच्या C-Lab प्रोग्राम अंतर्गत सॅमसंगने तयार केले आहे. हे अ‍ॅप कमी दृष्टी असलेल्यांसाठी एक प्रकारे विज्युअल अ‍ॅड अ‍ॅप सारखे काम करेल. यामुळे इमेज देखील क्लिअर दिसेल. हे कलर कान्ट्रॅस्ट आणि ब्राइटला अ‍ॅडजेस्ट करते.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like