नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Samsung चे टीव्ही महागात विकले जातात. त्यामुळे भारतीय बाजारात Xiaomi ने स्वस्त स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारातील स्पर्धा वाढली आहे. त्यानंतर हे पाहून सॅमसंगने देखील 12,999 रुपयांत आपला स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे. सॅमसंगने भारतात फनबिलिवेबल #funbelievable सीरिज लॉन्च केली आहे. हे टीव्ही 32 इंचापासून 42 इंचापर्यंत आहेत.
पर्सनल कंप्युटर मोड –
सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीला पर्सनल कंप्युटर मोडवर चालवला जाऊ शकतो. कंपनीकडून सांगण्यात आले की यात तुम्ही डॉक्यूमेंट्स तयार केले जाऊ शकतात आणि ऑफिस प्रेजेंटेशन देखील क्रिएट करु शकतात. लॅपटॉपला मिरर करण्याचे फीचर देखील या स्मार्ट टीव्ही मध्ये देण्यात आलेले आहे. इंटरनेटशिवाय तुम्ही वायरलेस लॅपटॉप सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीला कनेक्ट करु शकतात. रिमोट अॅक्सेस द्वारे तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवर इंटरनेटचा वापर करु शकतात.
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये कॉन्टेंक्ट अॅप्स देखील इंस्टॉल करण्यात आलेले आहेत. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ सहित वूट आणि सोनी लाईव्ह सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहू शकतात. सॅमसंगने सांगितले होते की या स्मार्ट टीव्हीला तुम्ही वर्चुअल म्यूझिक सिस्टममध्ये देखील बदलू शकतात. येथे यूजर्स विविध लाइब्ररीमधून ऑडिओ ऐकू शकतात. तसेच तुम्ही विविध थीम्स देखील ठेवू शकतात.
या सीरीजच्या टीव्हीची सुरुवात 12,990 रुपये आहे. यासह कंपनीने यावर दोन वर्षांची वॉरंटी देखील दिलेली आहे. कंपनीच्या मते या नव्या सीरीजच्या स्मार्ट टीव्हीला तुम्ही सॅमसंग प्लाजा, लींडिंग इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स, ऑनलाइन स्टोअर्स आणि सॅमसंगच्या अधिकृत स्टोरवरुन खरेदी करु शकतात. सॅमसंग इंडियाचे प्रेसिडेंट राजु पुल्लन म्हणाले, Funbelievable सीरीज आमच्या ग्राहकांच्या विशेष करुन तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करेल. आज लोक आपल्या टीव्हीला विविध प्रकारे कनेक्ट करु इच्छित आहेत. सध्या सॅमसंगने या टीव्हीच्या स्पेसिफिकेशन संबंधित माहिती दिलेली नाही.