Samsung नं लॉन्च केलं 65-इंच वाला ‘द फ्रेम’ QLED TV, कला प्रेमींसाठी खास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सॅमसंगने शुक्रवारी ‘द फ्रेम क्यूएलईडी टीव्ही’ चा 65 इंच व्हेरियंट भारतात लाँच केले. लॉन्चबरोबरच, फ्लिपकार्टच्या आगामी रिपब्लिक डे सेलदरम्यान ही फ्रेम विकली जाईल, अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. सॅमसंगच्या नवीन 65 इंचाच्या फ्रेमची किंमत 1,59,990 रुपये आहे. फ्लिपकार्ट विक्रीदरम्यान ग्राहक त्याची प्री-बुकिंग करू शकतील. प्री-बुक केलेल्या युनिटचे वितरण 1 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होईल.

यापूर्वी, सॅमसंगने मागील वर्षी ऑगस्टमध्ये 55 इंचाची फ्रेम लाँच केली होती. सध्या भारतात विक्रीसाठी तो 84,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे प्रीपेड व्यवहारावर 3,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅकचा फायदा घेऊ शकता. तसेच, हा टीव्ही मॉडेल्स कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरमधून देखील खरेदी केले जाऊ शकतात.

सेलमध्ये 65-इंचाचे व्हेरियंट देखील उपलब्ध :
सॅमसंग इंडियाच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘द फ्रेम; एक उत्कृष्ट मास्टरपीस आहे, ज्याला साधारण टीव्हीपेक्षा अधिक चांगले बनविले गेले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फ्लिपकार्टच्या विक्रीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सर्व टीव्ही मॉडेल्स विकली गेली. म्हणून आम्ही लोकप्रिय मागणीनुसार फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल दरम्यान फ्रेम परत आणण्याचे ठरविले. यावेळी आम्ही सेलमध्ये 65-इंचाचे व्हेरियंट उपलब्ध केले आहेत.

सॅमसंगने सांगितले की, क्यूएलईडी तंत्रज्ञान फ्रेममध्ये उपलब्ध आहे आणि ते टीव्हीला चित्र फ्रेममध्ये रूपांतरित करते, जे 1,000 हून अधिक आर्टवर्क दाखवते. या क्यूएलईडी टीव्हीमध्ये बिल्ट-इन मोशन आणि ब्राइटनेस सेन्सर देखील देण्यात आला आहे. जेव्हा टीव्ही वापरला जात नसेल तेव्हा तो आर्ट मोडमध्ये जाईल आणि आर्टच्या डिजिटल पिसला प्रदर्शित करतो. तसेच चित्रांच्या गुणवत्तेसाठी फ्रेममध्ये ‘क्वांटम डॉट’ तंत्रज्ञान, 120Hz रिफ्रेश रेट आणि एचडीआर 10+ अशी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

द फ्रेम बिक्सबी आणि गुगल असिस्टंटसोबत सुसंगत आहे. यामध्ये , वापरकर्ते त्यांच्या व्हॉइसद्वारे चॅनेल बदलणे, व्हॉल्युम अड्जस्ट करणे आणि प्लेबॅक नियंत्रित करणे यासारख्या गोष्टी करु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/