SAMSUNG नं लॉन्च केलं मेड इन इंडिया Galaxy Watch Active2 4G स्मार्टवॉच,जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तंत्रज्ञान उत्पादन तयार करणारी जागतिक कंपनी सॅमसंगने आपल्या नोएडा प्लांटमध्ये स्मार्टवॉचची निर्मितीही सुरू केली आहे. गुरुवारी कंपनीने सांगितले की, हे त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ प्रयत्नांचा एक भाग आहे. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने यासह नवीन ४जी स्मार्टवॉच ‘गॅलेक्सी वॉच ऍक्टिव्ह२ ४जी’ ची एल्युमिनियम आवृत्ती देखील सादर केली. हे देशातच तयार केले गेले आहे. त्याची किंमत २८,४९० रुपये आहे. ११ जुलैपासून ते ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होईल.

सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदीप सिंह यांनी एका निवेदनात म्हटले, ‘गॅलेक्सी वॉच ऍक्टिव्ह२ ४जी’ हे कंपनीचे सर्वात स्वस्त ४जी स्मार्टवॉच आहे. देशात बनवलेले हे पहिले स्मार्टवॉच आहे. ‘गॅलेक्सी वॉच अ‍ॅक्टिव्ह२ ४जी’ सोबतच आम्ही ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत भारतात एकूण १८ स्मार्टवॉच बनवण्यास सुरुवात केली आहे. मात्र कंपनीने स्मार्टवॉच बनवण्याची वार्षिक क्षमता आणि त्यावरील गुंतवणूकीविषयी कोणतीही माहिती दिली नाही.

जून २०१७ मध्ये कंपनीने उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये रेफ्रिजरेटर आणि स्मार्टफोन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ४,९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. २०२० अखेरपर्यंत नोएडा प्लांटमध्ये हँडसेट उत्पादन क्षमता दुप्पट करून १२० कोटी वार्षिक करण्याची कंपनीची योजना आहे.

विधानानुसार, ‘गॅलॅक्सी वॉच ऍक्टिव२ ४जी’ ४२ मिलीमीटर, ४४ मिलीमीटर आणि ४६ मिलीमीटर व्यासाच्या डायलच्या आकारात उपलब्ध असेल. कंपनीच्या १८ स्मार्टवॉचच्या किंमती १९,९९० रुपयापासून सुरु होऊन ३५,९९० रुपयेपर्यंत आहेत.