सॅमसंगचे ‘हे’ 5 जबरदस्त स्मार्टफोन झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मागील आठवड्यात दक्षिण कोरिया देशातील स्मार्टफोन कंपनी असलेल्या सॅमसंगने अनेक स्मार्टफोनची किंमत कमी केलीय. यात कंपनीच्या फोल्डेबल फोन Galaxy Z Flip पासून ते गॅलेक्सी Note 10 Lite आणि ए सीरीजच्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. यात कंपनीचे विविध रेंजमधील स्मार्टफोन्स असून या स्मार्टफोनची किंमत १६ हजार रुपयांपासून १ लाख १६ हजार रुपयांपर्यंत आहेत.

Galaxy Z Flip च्या किंमतीत ७ हजार रूपयांची कपात

सॅमसंग कंपनीने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत ७ हजार रुपयांनी कमी केलीय. फोनची किंमत अगोदर सुमारे १ लाख १५ हजार ९९९ रुपये इतकी होती. आता ती १ लाख ८ हजार ९९९ रुपये इतकी झालीय. यात दोन डिस्प्ले दिलेत. प्रायमरी डिस्प्ले ६.७ इंचचा असून सेकंडरी डिस्प्ले १.१० इंचचा आहे. तसेच यात 12MP + 12MP चा रियर कॅमेरा सेटअपसह १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलाय, या फोनची वैशिष्ट्ये आहेत.

आता गॅलेक्सी Note 10 Lite चार हजार रूपयांनी स्वस्त

सॅमसंग गॅलेक्सी नोट १० लाइटची किंमत देखील ४ हजार रुपयांनी कमी केल्याने आता हा फोन स्वस्त झाला आहे. यानंतर ६ जीबी रॅम मॉडलची किंमत ३७ हजार ९९९ रुपये, ८ जीबी रॅमच्या मॉडलची किंमत ४३ हजार ९९९ रुपये इतकी आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले 12MP + 12MP + 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा, 32MP चा फ्रंट कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरी देखील दिलीय.

‘गॅलेक्सी ए सीरीज‘चे 3 फोन झाले स्वस्त

कंपनीने गॅलेक्सी A51, गॅलेक्सी A31 आणि गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या किंमतीत देखील कपात केल्याने हे फोन स्वस्त झाले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए 51 च्या टॉप व्हेरियंटची किंमत 1 हजार रुपयांनी स्वस्त केली आहे. आता या 8 जीबी रॅम मॉडलची किंमत 26 हजार 999 रुपये इतकी झालीय.

तर, गॅलेक्सी ए 31 च्या किंमतीत 1 हजार रुपयांची कपात केली असून हा फोन एकाच व्हेरियंट (6GB + 128GB) मध्ये उपलब्ध केला आहे. या फोनला आता 20 हजार 999 रुपयांत खरेदी करता येईल. तर सॅमसंग गॅलेक्सी ए 21 एस च्या 4 जीबी प्लस 64 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 500 रुपये इतकी कमी केलीय. टॉप मॉडलची (6GB + 64GB) च्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केलीय.