‘संविधान’ सर्वोत्कृष्ट हिंदी ‘शब्द’, ऑक्सफर्ड डिक्शनरीकडून ‘गौरव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संविधान शब्दांचा मान आता आणखी वाढला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने संविधान शब्दाला 2019 मधील सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून जाहीर केले आहे. संविधान शब्दाने सर्वांचे लक्ष आकृष्ट केले होते. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुत्वाच्या मूल्यांना संविधानाच्या कसोटीवर तपासलं गेलं. त्यामुळे हा शब्द गेल्या वर्षी लोकप्रिय ठरला. म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने संविधान शब्दाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट शब्द असा मान दिल्याचे सांगितले.

संविधानाचा अर्थ सांगताना ऑक्सफर्डने म्हणले की संविधान शब्द हा शब्दही आहे आणि अभिव्यक्ती देखील. या शब्दाने 2019 मध्ये सर्व देशवासियांचे लक्ष वेधून घेतले. लोकांनी भावना व्यक्त केल्या. मूलभूत सिद्धांताच्या एकत्रिकरणाने किंवा स्थापित दृष्टांतामुळे एक देश किंवा संघटन प्रस्थापित होते.

म्हणून या शब्दाची निवड –
जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35 ए रद्द करण्यात आल्यानंतर संविधान शब्द व्यापक प्रमाणात वापराला जाऊ लागला. हे दोन्ही अनुच्छेद रद्द करण्यात आल्याने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला. ॲकेडमिक शब्द असलेला संविधान एक चळवळ बनला असे हिंदी लॅंग्वेज चॅम्पियन फॉर लँग्वेजजच्या कृतिका अग्रवाल यांनी सांगितले. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या टीमने फेसबूक पेजवरुन हिंदीचे शब्द सूचवण्याची मागणी केली होती. यावर लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक शब्दांची निवड ऑक्सफर्डने केली.

याआधी ऑक्सफर्ड डिक्शनरीने आधार, चॉल,हडताल, डबा, शादी अशा शब्दांचा डिक्शनरीत समावेश केला आहे. शुक्रवारी ऑक्सफर्डची नवी आवृत्ती लॉन्च करण्यात आली. ऑक्सफर्डची ही 10 वी आवृती आहे. त्यात 384 भारतीय शब्दांचा समावेश असून जगभरातील भाषांमधील एकूण एक हजार शब्दांचा समावेश या नव्या डिक्शनरीत करण्यात आला आहे. चॉटबॉट, फेकन्यूज आणि मायक्रोप्लास्टिक इत्यादी शब्दांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा